एक काळ असा होता जेव्हा मोनिका बेदी आणि अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्यासोबत अभिनेत्रीच्या नात्याच्या चर्चा रंगल्या. पण काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यासोबत अभिनेत्रीच्या मैत्रीच्या चर्चांनी जोर धरला.
मोहम्मद अजहरुद्दीन यांनी बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यासोबत देखील लग्न केलं होतं. संगीतासोबत लग्न करण्यासाठी क्रिकेटपटूने पहिली पत्नी नौरीन हिच्याकडून घटस्फोट घेतला. पण संगीतासोबत देखील त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर २०१० मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
मोहम्मद अजहरुद्दीन आणि मोनिका बेदी यांच्या नात्याची रंगली, जेव्हा अजहर-नौरीन यांचा मुलगा असद याच्या लग्नात मोनिका पाहुणी म्हणून उपस्थित राहिली.
रिपोर्टनुसार, मोहम्मद अजहरुद्दीन आणि मोनिका बेदी अनेक दिवसांपासून एकत्र आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद अजहरुद्दीन आणि मोनिका बेदी यांची ओळख कॉमन फ्रेंड संजय निरुपम यांच्या माध्यमातून झाली.
पण एक काळ असा होता, जेव्हा मोनिका बेदी आणि अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मोनिका हिच्यासोबत लग्न झालं असल्याचा दावा अबू सलेम याने केले होता. पण मोनिकाने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला.
रिपोर्टनुसार, मोनिका बेदी आणि अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम यांची ओळख दुबईमध्ये झाली होती. तेव्हा अबू सालेम हा अंडरवर्ल्ड डॉन आहे... ही गोष्ट अभिनेत्रीला माहिती नव्हती.
गँगस्टर अबू सालेमच्या प्रेमात अडकलेल्या मोनिकाला बनावट पासपोर्ट प्रकरणात पाच वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. 2007 मध्ये, जेव्हा मोनिका तुरुंगातून शिक्षा पूर्ण करून बाहेर आली तेव्हा तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गर्दी जमली होती.