24 व्या वर्षी खासदार, 37 व्या वर्षी पंतप्रधान, मोदींनी ही केले अभिनंदन

| Updated on: Apr 10, 2024 | 6:48 PM

देशाचे पंतप्रधान होणे म्हणजे एक खूप मोठी जबाबदारी असते. अनेकांना पंतप्रधान होण्याची इच्छा असते पण खूप कमी लोकांना या पदापर्यंत पोहोचता येते. आता वयाच्या ३७ व्या वर्षी पंतप्रधान झाल्याने पंतप्रधान मोदींनी देखील या देशाच्या पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे.

1 / 5
खासदार सायमन हॅरिस यांची मंगळवारी संसदेत मतदानाद्वारे आयर्लंडचे नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. वयाच्या 37 व्या वर्षी देशाचे पंतप्रधान बनणारे ते सर्वात तरुण व्यक्ती आहेत.

2 / 5
वराडकर यांनी गेल्या महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची आश्चर्यकारक घोषणा केली होती. वराडकर यांच्या सरकारमध्ये हॅरिस यांनी उच्च शिक्षण मंत्री म्हणून काम केले.

3 / 5
डब्लिन येथील राष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या एका समारंभात अध्यक्ष मायकल डी हिगिन्स यांनी या पदावर त्यांची औपचारिक नियुक्ती केली.

4 / 5
हॅरिस हे वयाच्या 24 व्या वर्षी पहिल्यांदा संसदेत निवडून आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.

5 / 5
आज तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचा सन्मान करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास कटिबद्ध असल्याचे हॅरिस म्हणाले.