मुकेश अंबानीच्या रिलायन्सकडून जागतिक दर्जाची स्मार्ट सिटी, जाणून घ्या काय असणार सुविधा

| Updated on: Jun 15, 2023 | 2:50 PM

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने जागतिक दर्जाची स्मार्ट सिटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मॉडेल इकॉनॉमिक टाउनशिप लिमिटेड किंवा मेट सिटी असे नाव देण्यात आले आहे. हे स्मार्ट सिटी एकात्मिक औद्योगिक शहर असणार आहे.

1 / 6
Relianदेशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्रामजवळ जागतिक दर्जाची स्मार्ट सिटी उभारत आहे. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्सद्वारे ही स्मार्ट सिटी उभारली जात आहे. ce unit to build smart city

2 / 6
मॉडेल इकॉनॉमिक टाउनशिप लिमिटेड किंवा मेट सिटी असे नाव देण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने म्हटले आहे की, या स्मार्ट सिटीची जबाबदारी त्यांची उपकंपनी मॉडेल इकॉनॉमिक टाउनशिप लिमिटेडची आहे. गुरुग्रामजवळ जागतिक दर्जाचे स्मार्ट सिटी विकसित करत आहे. हे स्मार्ट सिटी एकात्मिक औद्योगिक शहर असेल.

3 / 6
स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये जपानच्या 4 दिग्गज कंपन्या सहभागी होणार आहेत. रिलायन्सची मॉडेल इकॉनॉमिक टाउनशिप ही उत्तर भारतातील सर्वात वेगाने वाढणारी टाउनशिप आहे. हे सर्वात वेगाने वाढणारे एकात्मिक शहर देखील बनले आहे. या स्मार्ट सिटीमध्ये येणाऱ्या कंपन्यांमध्ये 7 देशांतील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे.

4 / 6
रिलायन्सची 100 टक्के उपकंपनी असलेल्या या कंपनीने हरियाणातील झज्जर जिल्ह्यात 8,000 एकर जागेवर जागतिक दर्जाचे ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. येथे पहिल्या टप्प्यात १ हजार ९०० एकर जागेवर शहर वसविण्याचा परवाना देण्यात आला आहे

5 / 6
कंपनीने आतापर्यंत येथील जमिनीच्या पायाभूत सुविधांवर 8,800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यात 5 औद्योगिक क्षेत्रे आहेत, तर 2 प्रकल्प SCO चे आहेत. आतापर्यंत 25 हजार जणांना रोजगार दिला आहे.

6 / 6
रिलायन्सच्या या नव्या शहराची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची कनेक्टिव्हिटी आहे. दिल्ली, गुरुग्राम, नोएडा आणि प्रदेशातील इतर शहरांशी मजबूत कनेक्टिव्हिटी आहे. हे शहर रणनीतिकदृष्ट्या कुंडली मानेसर पलवल (KMP) एक्सप्रेसवे आणि नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्थित आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) च्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) शी रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल.