Mukesh Ambani | 728 कोटींमध्ये खरेदी केलेलं अंबानींचं न्यूयॉकमधील आलिशान हॉटेल पाहिलात का? भारीच आहे!
Mandarin Oriental : तब्बल 9.81 कोटी डॉलर म्हणजेच 728 कोटी रुपये खर्चून त्यांनी न्यूयॉर्कमधील आलिशान हॉटेल खरेदी केलं आहे. न्यूयॉकमधील हे हॉटेल एक प्रतिष्ठित हॉटेल म्हणून ओळखलं जातं. रिलाईन्स इंडस्ट्रीज लिमिटेडट्या माध्यमातून त्यांनी या हॉटेलची खरेदी केली आहे.
1 / 11
मुकेश अंबानी यांनी सलग दुसरी मोठी इन्व्हेस्टमेन्ट केली आहे. तब्बल 728 कोटी रुपयांन अत्यंत महागडं आणि आलिशान हॉटेल त्यांनी खरेदी केलंय. लंडनमध्ये त्यांनी केलेल्या या खरेदीची एक झलक... (Image Source - Google)
2 / 11
मुकेश अंबानी नेमके आपले पैसे गुंतवत आहेत, याकडे अनेकांची बारीक नजर असते. अशात त्यांनी सलग दुसऱ्यांदा एक खास खरेदी केली आहे. लंडनमधील एका खास हॉटेलमध्ये त्यांनी पैसे गुंतवले आहेत. देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत. (Image Source - Google)
3 / 11
मुकेश अंबानी यांनी नुकताच एक रिसॉर्ट पार्क खरेदी केला होता. त्यानंतर त्यांनी आता न्यूयॉर्कमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी लंडनच्या कंट्री क्लब आणि गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्कची खरेदी आधी केली होती. आता त्यांनी लक्झरी मँडरीन ओरिएंटर हे हॉटेल खरेदी केलंय. (Image Source - Google)
4 / 11
तब्बल 9.81 कोटी डॉलर म्हणजेच 728 कोटी रुपये खर्चून त्यांनी न्यूयॉर्कमधील आलिशान हॉटेल खरेदी केलं आहे. न्यूयॉकमधील हे हॉटेल एक प्रतिष्ठित हॉटेल म्हणून ओळखलं जातं. रिलाईन्स इंडस्ट्रीज लिमिटेडट्या माध्यमातून त्यांनी या हॉटेलची खरेदी केली आहे. (Image Source - Google)
5 / 11
न्यूयॉर्कच्या 80 कोलंबस इथं हे हॉटेल असून 2003 साली या हॉटेलची उभारणी करण्यात आली होती. (Image Source - Google)
6 / 11
सेंट्र पार्क आणि कोलंबस सर्कलजवळ हे हॉटेल असून या हॉटेलमधील थाट हा एकमद शाही राजमहालासारखा आहे. (Image Source - Google)
7 / 11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केलेल्या या हॉटेलमधील एका रुमची किंमत 10 लाखापेक्षा जास्त आहे. एकूण 248 रुम या आलिशान हॉटेलमध्ये आहेत. (Image Source - Google)
8 / 11
एक भव्य उमारतीच्या 35 व्या मजल्यापासून 54 व्या मजल्यापर्यंत हे हॉटेल असून या हॉटेलचं आतला नजरा बघण्यासारखा आहे. (Image Source - Google)
9 / 11
वर्षभराच्या आत रिलाईन्सनं केलेली दुसरी मोठी खरेदी आहे. याआधी मुकेश अंबानी यांनी 592 कोटी रुपये खर्चून आयकॉनिक कंट्री क्लब आणि गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्कची खरेदी केली होती. (Image Source - Google)
10 / 11
गेल्या काही काळापासून रिलाईन्सची हॉटेल क्षेत्रात मोठी गुंतवणूक सुरु असून त्यांनी गेल्या काही काळात महत्त्वपूर्ण खरेदी केलेल्या आहेत. रिलाईन्सची EIH मर्यादित मध्येही गुंतवणूक आहे. (Image Source - Google)
11 / 11
RIIHL म्हणजे रिलाईन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेन्ट एन्ड होल्डिंग्स लिमिटेड या रिलाईनच्याच उपकंपनीचं या हॉटेलमधील आपल्या शेअर्सची माहिती दिली आहे. 73.37 टक्के इतके या हॉटेलचे शेअर्स मुकेश अंबानी यांनी विकत घेतले आहेत. (Image Source - Google)