आयुर्वेदात तुळशीला औषधी वनस्पती म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. तुळशीचे सेवन आपल्या शरीराला बर्याच आजारांपासून सुरक्षित ठेवते. विशेष म्हणजे तुळशी आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. केस गळती रोखण्यासाठी आपण तुळशीचा हा खास हेअर मास्क वापरू शकतात.
टॅनिंग कमी करण्यासाठी आपण नारळ तेल, साखर आणि मुलतानी माती एकत्र मिक्स करा. आणि ते चेहऱ्यावर लावू लावा. हलक्या हाताने चेहऱ्यावर स्क्रब करून ते काढा. यामुळे टॅनिंग कमी होण्यास मदत होईल.
चेहरा चमकदार बनवण्यासाठी तुम्ही टोमॅटोचा रस आणि चंदन पावडर मिक्स करून चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी मुलतानी माती, दूध आणि बदामाची पेस्ट बनवा. पेस्ट तयार करण्यासाठी बदाम रात्रभर भिजवा. या पेस्टमुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.