Mumbai Boat Capsized: मुंबई बोट अपघात फोटोमधून, नेमकी कशी घडली घटना जाणून घ्या…

| Updated on: Dec 18, 2024 | 9:29 PM

Mumbai Boat Capsized: मुंबईतील समुद्रात बुधवारी मोठी दुर्घटना घडली. गेट ऑफ इंडियाजवळ घडलेल्या या दुर्घटनेमुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे. नौदलाच्या बोटीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्या बोटीने नीलकमल या बोटीला धडक दिली.

1 / 5
नीलकमल ही बोट ११० प्रवाशांना घेऊन गेट वे ऑफ इंडियावरुन निघाली होती. बोट निघाल्यानंतर सुमारे ३५ मिनिटांनी नौदलाची बोट या बोटीवर आदळली. त्यामुळे बोट उलटली.

2 / 5
नौदलाच्या बोटीला नवीन इंजीन लावण्यात आले होते. नवीन इंजिनाची चाचणी घेण्याचे काम सुरु होते.  त्या चाचणीच्या वेळी इंजीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे बोटीवरील ताबा गेला. त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली.

3 / 5
बोट अपघातात सुखरूप झालेल्या प्रवाशांनी घटनाक्रम सांगितला. बोटीत सुरक्षेचा प्रश्न होता. जेव्हा बोटीत पाणी गेले त्यानंतर आम्ही वरती जाऊन लाईव्ह जॅकेट घातले.  त्यामुळे आम्ही बचावलो आहोत.

4 / 5
 बोट अपघातात मृत्यूमुखी झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या अपघातात अजून कोणी बेपत्ता आहे का? त्याची माहिती गुरुवारी सकाळी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

5 / 5
बोट अपघात प्रकरणी नीलकमल बोटीचे मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बोटीची क्षमता ८० प्रवाशांची असताना बोटीत ११० प्रवाशी होते. त्यामुळे बोट मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.