Mumbai Indians ठरला IPL 2022 मधून बाहेर होणारा पहिला संघ, जाणून घ्या लज्जास्पद प्रदर्शनाची पाच कारणं

| Updated on: May 05, 2022 | 3:25 PM

IPL 2022: मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 च्या ऑक्शनआधी चार खेळाडूंना रिटेन केलं होतं. यात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंचा समावेश आहे.

1 / 10
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 च्या ऑक्शनआधी चार खेळाडूंना रिटेन केलं होतं. यात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंचा समावेश आहे. मुंबईने ज्या चार खेळाडूंवर विश्वास दाखवला त्यातले तीन चाललेच नाहीत.

2 / 10
रोहित शर्माने आतापर्यंत 17.22 च्या सरासरीने 155 धावा केल्या आहेत. पोलार्डने 15.62 च्या सरासरीने 125 रन्स केलेत. बुमराहने 9 सामन्यात फक्त 5 विकेट घेतलेत. त्यामुळे यात मुंबईचच नुकसान झालं आहे.

3 / 10
मुंबईच्या पराभवाचं दुसरं कारण आहे कमकुवत गोलंदाजी. मागच्या सीजनमध्ये मुंबईकडे ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर सारखे सुरेख गोलंदाज होते. पण आता जसप्रीत बुमराह सोडल्यास त्यांच्याकडे दुसरा प्रभावशाली गोलंदाज नाहीय.

4 / 10
बासिल थम्पी, जयदेव उनाडकट, डॅनियल सॅम्स, तायमल मिल्स पूर्णपणे अपयशी ठरलेत. मुरुगन अश्विनने फक्त काही सामन्यात चांगली गोलंदाजी केली. एकूणच मुंबईची गोलंदाजी कमकुवत होती. तेच त्यांच्या अपयशाचं आणखी एक कारण आहे.

5 / 10
रणनिती सुद्धा मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं एक कारण आहे. कारण टिम डेविड सारख्या खेळाडूवर त्यांनी भरवसा दाखवला नाही. फक्त दोन सामन्यानंतर त्याला बाहेर बसवलं. दुसऱ्यादा संधी मिळाली, तेव्हा त्याने टिमला विजय मिळवून दिला.

6 / 10
कायरन पोलार्ड फॉर्ममध्ये नव्हता, तरी त्याला अनेक संधी दिल्या. रोहित शर्मा सलामीला फ्लॉप ठरत होता, तरीही त्याच्या पोजिशनमध्ये बदल झाला नाही.

7 / 10
इशान किशनला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. या खेळाडूवर मुंबईने जास्त पैसे खर्च केले, त्याचा दबाव स्वत: इशानही झेलू शकला नाही.

8 / 10
इशानने 28.12 च्या सरासरीने 225 धावा केल्या. एका ओपनरसाठी हे आकडे चांगले नाहीयत. इशानला चांगली सुरुवात मिळूनही, तो मोठी खेळी करु शकला नाही.

9 / 10
सूर्यकुमार यादवची दुखापत मुंबईला थोडी महाग ठरली. दुखापतीमुळे सूर्यकुमार पहिले दोन सामने खेळला नाही. हा खेळाडू पहिल्या मॅचपासून उपलब्ध असता, तर कदाचित मुंबई इंडियन्सला विजय मिळाला असता.

10 / 10
सूर्यकुमार यादवने या सीजनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी चांगलं प्रदर्शन केलय. सूर्यकुमारने 7 सामन्यात 290 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी जवळपास 50 आहे.