अंबरनाथ,कल्याण, बदलापूर, भिवंडी, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कर्जत, कर्जत, कसारा, या भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे.
कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान अनेक लोकल गाड्या बंद पडून आहेत. गाड्या बंद असल्याने प्रवाशांनी अखेर रेल्वेखाली उतरुन घरी परतण्याचा निर्णय घेताना दिसत आहे.
मुख्य स्टेशन असलेल्या दादर आणि सीएसटी रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झालेली आहे.
गाड्याच नसल्याने स्टेशनला प्रवाशी लोकल सेवा कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत आहेत.
दादर स्टेशनवरील फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता गर्दी किती प्रमाणात वाढताना दिसत आहे.
सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशी घरी जाण्यासाठी गाड्यांच्या प्रतीक्षेत आहेत. तर बाहेर पावसाचा जोर वाढताना दिसत आहे.
वाढत्या पावसामुळे शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरी लवकर सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.