Mumbai Rain | मुंबईच्या पावसात रंगली ऑनस्क्रिन जोडप्यांची ‘लव्हस्टोरी…’ आणि गाजली रोमाँटिक गाणी

| Updated on: Jun 25, 2023 | 10:34 AM

मुंबईतील पहिल्या पावसाचं आकर्षण फक्त मुंबईकरांनाच नसतं, तर इतर शहरातील लोक देखील मुंबईच्या पहिल्या पावसाच्या प्रतीक्षेत असतात. मुंबईतील पाऊस, प्रेम आणि बॉलिवूडची रोमाँटिक गाणी... आयुष्यात मुंबईच्या पावसामुळे बॉलिवूडमध्ये अनेक लव्हस्टोरी रंगल्या. बॉलिवूडची काही अशी गाणी जी पहिल्या पावसात कोणी विसरुच शकत नाही.

1 / 12
 प्यार हुआ इकरार हुआ : हे गाणं १९५५ साली प्रदर्शित झालेल्या 'श्री ४२०' सिनेमातील आहे. पण आजही हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. प्यार हुआ इकरार हुआ हे गाणे अभिनेते राज कपूर आणि अभिनेत्री नर्गिस यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं.

2 / 12
सावन बरसे तरसे दिल : या गाण्याची तर गोष्टच काही वेगळी होती.. ९० च्या शतकातील हे गाणं आजही नवंच वाटतं. अभिनेता अक्षय खन्ना आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं सावन बरसे तरसे दिल गाणं 'दहक' सिनेमातील आहे. 'दहक' सिनेमा १९९९ साली प्रदर्शित झाला होता.

3 / 12
रिम झिम के तराने लेके आयी बरसात : हे गाणं देखील तुम्हाला नक्की आठवत असेल. अभिनेते देव आनंद आणि वाहिदा रेहमान यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं गाणं मुंबईच्या रस्त्यांवर शुट झालं होतं. १९६० साली प्रदर्शित झालेलं हे गाणं 'काला बाझार' सिनेमातील आहे.

4 / 12
 रिमझिम गिरे सावन : गायक आर.डी. बर्मन यांनी गायलेलं हे गाणं आजही लोकप्रिय आहे. मुंबईतील पाऊस या गाण्याशिवाय अधुरा आहे. अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं 'मंझील' सिनेमातील आहे.

5 / 12
तुम जो मिल गए हो : लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गाणं आजही प्रसिद्ध आहे. ७० च्या दशकातील हे गाणं आजही प्रचंड लोकप्रिय आहे. या गाण्यासोबत तुमच्या देखील काही आठवणी नक्की असतील. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या 'हँसते जख्म' सिनेमातील हे गाणं आहे.

6 / 12
आज रपट जाये तो... : या गाण्याचे अनेक किस्से समोर आले. अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं 'नमक हलाल' सिनेमातील आहे. हे गाणं बप्पी लहरी यांनी कम्पोज केलं होतं आणि आशा भोसले - किशोर कुमार यांनी गाण्याला आवाज दिला होता.

7 / 12
लगी आज सावन की :  हे गाणं १९८९ साली प्रदर्शित झालेल्या 'चांदनी' सिनेमातील आहे. अभिनेता विनोद खन्ना आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर हे  चित्रीत करण्यात आलं होतं.

8 / 12
 बेहता है मन कही : 'चमेली' सिनेमातील हे गाणं आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. हे गाणं अभिनेत्री करीना कपूर हिच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. 'चमेली' सिनेमा २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या गाण्यामुळे करीनाच्या लोकप्रियतेत देखील प्रचंड वाढ झाली होती.

9 / 12
गीला गीला पानी : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं 'सत्या' सिनेमातील गायिका लता मंगेशकर यांनी गायलं होतं.

10 / 12
एक लडकी भिगी भागी सी : 'चलती का नाम गाडी' सिनेमातील हे गाणं आजही प्रचंड प्रसिद्ध आहे. अभिनेत्री मधुबाला यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं गाणं पूर्ण पावसात शूट झालं होतं. आजही हे गाणं तितक्याच आवडीने पाहिलं आणि ऐकलं जातं.

11 / 12
ताल से ताल मीला : अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचं गाणं ताल से ताल मीला आज ही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर अनेकांना या गाण्यावर रिल्स देखील बनवले आहेत. 'ताल' सिनेमातील गाण्यात ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींसोबत डान्स करताना आणि पावसाचा आनंद घेताना दिसत आहे.

12 / 12
कोई लडकी है : ९० चं शतक बॉलिवूडचा सर्वात बेस्ट काळ होता असं म्हणायला हरकत नाही. कारण शाहरुख, माधुरी, सलमान, करिश्मा यांच्यामुळे असंख्या आठवणी ९० च्या शतकातील मुलांकडे आहेत. 'दिल तो पागल हैं' सिनेमातील कोई लडकी है गाणं शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं.