Marathi News Photo gallery Munjya box office collection Becomes Bollywoods First Super Hit In 2024 sharvari wagh and abhay verma
Munjya : 30 कोटी बजेटच्या ‘मुंज्या’ने कमावला तब्बल इतक्या कोटींचा नफा
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांच्या भूमिका आहेत. त्यात शर्वरी वाघ, भाग्यश्री लिमये, सुहास जोशी, अजय पूरकर यांचा समावेश आहे. याशिवाय मोना सिंग, अभय वर्मा यांच्याही भूमिका आहेत.
1 / 5
अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांच्या मुख्य भूमिका असलेला 'मुंज्या' हा चित्रपट या वर्षातील पहिला सुपरहिट चित्रपट ठरतोय. या हॉरर कॉमेडी चित्रपटाने गेल्या 16 दिवसात बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.
2 / 5
आश्चर्याची बाब म्हणजे 'मुंज्या' प्रदर्शित होण्याआधी त्याची काहीच चर्चा नव्हती. मात्र प्रदर्शनानंतर 'माऊथ पब्लिसिटी'चा त्याला मोठा फायदा झाला. सोशल मीडियावर त्याची इतकी चर्चा झाली की थिएटरकडे अधिकाधिक प्रेक्षकवर्ग आपसूकच आकर्षित झाला.
3 / 5
प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी 'मुंज्या'ने 5.80 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आतापर्यंत कमाईचा आकडा 80.11 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ही कमाई येत्या काही दिवसांत 100 कोटींपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
4 / 5
'मुंज्या' हा चित्रपट अवघ्या 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. म्हणजेच आतापर्यंत या चित्रपटाने 50 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. याआधी आर. माधवन आणि अजय देवगण यांचा 'शैतान' हा चित्रपटसुद्धा हिट ठरला होता.
5 / 5
'मुंज्या' हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे डिजिटल राइट्स हॉटस्टारने विकत घेतले आहेत. दोन महिन्यांनंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.