मनोहर जोशींच्या नातीच्या चित्रपटाची जोरदार चर्चा; ‘मुंज्या’ने अजय देवगणलाही टाकलं मागे
आपल्या नेहमीच्या शैलीबाहेर जाऊन 'मुंज्या'च्या माध्यमातून सरपोतदार यांनी केलेला हॉरर-कॉमेडी चित्रपट दिग्दर्शनाचा प्रयत्न बऱ्यापैकी जमून आला आहे. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
1 / 5
'स्त्री' आणि 'भेडिया'नंतर 'मुंज्या' हा त्याच हॉरर-कॉमेडी मालिकेतला तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठीत 'फास्टर फेणे', 'झोंबिवली', 'उनाड' यांसारखे विविधांगी चित्रपट देणाऱ्या आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे.
2 / 5
7 जून रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यात कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. मुंज्याने पहिल्या आठवड्यात 35.3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
3 / 5
गेल्या दहा दिवसांत या चित्रपटाने 53.80 कोटी रुपये कमावले आहेत. अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटाच्या लाइफटाइम कलेक्शनला 'मुंज्या'ने पार केलंय. हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होईल, असाही अंदाज व्यक्त केला जातोय.
4 / 5
हॉरर कॉमेडी चित्रपट पाहताना मनात भयही दाटलं पाहिजे आणि त्यातल्या गमतीने त्याही अवस्थेत चेहऱ्यावर हसू फुटलं पाहिजे. 'मुंज्या'मध्ये सीजीआयचा वापर करून बनवलेली भुताची आकृती प्रेक्षकांना प्रत्यक्ष खेळ घडवताना दिसले.
5 / 5
कोकणात झालेलं शूटिंग, मराठी घरात घडणारी कथा असल्याने एकापेक्षा एक दमदार मराठी कलाकार आणि उत्तम व्हीएफएक्सच्या माध्यमातून 'मुंज्या'सह गोष्ट रंगवण्याचा केलेला प्रयत्न.. या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.