सातपुडा जंगलात भीषण वनवा, चार दिवसांपासून आग कायम, आगीने 10 किलोमीटरपर्यंत परिसर व्यापला

| Updated on: Mar 20, 2025 | 6:54 PM

Satpura Forest Fire: नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग लागली आहे. चार दिवसांपासून ही आग सुरु आहे. आग दहा किलोमीटरपर्यंत जंगलात पसरली आहे. जंगलातील सर्व झाडे जळून खाक झाली आहेत. आगीत अनेक जंगली प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

1 / 5
सातपुड्याचा जंगलाला लागलेला भीषण वनवा चार दिवसांपासून सुरु आहे. धडगाव वनक्षेत्रातील 4 ते 5 हेक्टर क्षेत्रामध्ये लागलेली भीषण आग अजूनही विझवता आली नाही. बलक क्षेत्रातील साधारण 10 किलोमीटर अंतरपर्यंत ही आग पसरली आहे.

2 / 5
आगीत सातपुड्यातील डोंगर जळून खाक झाले आहे. चार दिवस उलटले तरी आगीचे लोट डोंगरांवर दिसत आहे. आगीच्या भडक्यात शेकडो झाड जळून  खाक झाली आहे. जनावरांचा चारा देखील जळून खाक झाला आहे.

3 / 5
डोंगराला लागलेल्या भीषण आगीत वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. तसेच डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांचे पाडे आणि वस्त्या आहेत. त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे.

4 / 5
आगीचे नेमके कारण अजून समोर आले नाही. परंतु झाडापासून कोळसा मिळावा यासाठी आग जाणून बुजून लावली गेली असल्याची शक्यता आहे. वनविभाग आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. परंतु अद्याप आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही.

5 / 5
सातपुडा पर्वतरांगांमधील जंगलामध्ये सर्रासपणे वृक्षतोड केली जाते. यामुळे जंगलातील मौल्यवान वनस्पती, औषधे नामशेष होत चालली आहेत. तसेच सातपुड्याच्या जंगलात हरीण, ससा, बिबट्या, माकड, अस्वल, कोल्हा, लांडगा आहेत. या आगीमुळे या प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.