दिवाळीच्या पार्श्वभूमिवर सध्या बाजारपेठ्या सजल्या आहेत. पण यात अनेकदा भेसळयुक्त वस्तू विकल्या जातात. पण नाशिकच्या शहा कुटुंबाने एक उत्तम कलाकृती सादर केली आहे.
देशी गायीच्या शेणापासून दिवाळीसाठी रांगोळी आणि पणत्या साकारल्या आहेत.
सध्या सर्वत्र या रांगोळीची चर्चा आहे. विविध फुलांच्या कलाकृती त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारल्या आहेत.
सत्यजित शहा यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने या अनोख्या रांगोळी साकारत पुन्हा एकदा देशी गायीचं महत्व स्पष्ट केलं आहे.
बाजारात चायना वस्तू या सण उत्सवांमध्ये अधिक विकल्या जातात. मात्र, त्यांनी आपल्याकडे असलेल्या देशी गायीचं शेण उपयोगात आणून आरोग्यदायी दिवाळीचा संदेश दिला आहे.
त्यांनी आपल्या अंगणात साकारल्या जाणाऱ्या रेडिमेंड रांगोळी तयार केल्या आहेत.
या रांगोळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अगदी अमेरिकेतूनदेखील त्यांना रांगोळीची मागणी आली आहे.
या व्यवसायात सत्यजित शहा यांना त्यांची दोन लहान मुलांचीही मदत होते.