National Film Awards: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना बक्षिसाची रक्कम किती मिळते?

| Updated on: Aug 16, 2024 | 3:27 PM

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून त्यात 'कांतारा' या कन्नड चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्यांना बक्षीस म्हणून किती रक्कम मिळते, ते जाणून घेऊयात..

1 / 5
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली. कन्नड अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 'कांतारा' या चित्रपटासाठी त्याला पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचं स्वरुप रजत कमळ आणि दोन लाख रुपये असं असेल.

2 / 5
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार दोन अभिनेत्रींमध्ये विभागला गेला आहे. 'तिरुचित्रांबलम' या तमिळ चित्रपटासाठी अभिनेत्री नित्या मेननला आणि 'कच्छ एक्स्प्रेस' या गुजराती चित्रपटासाठी अभिनेत्री मानसी पारेखला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यासाठी दोघींमध्ये रजत कमळ आणि दोन लाख रुपये बक्षिसाची रक्कम विभाजित होईल.

3 / 5
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार 'गुलमोहर'ला जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते स्टार इंडिया प्रायव्हेड लिमिटेड आणि दिग्दर्शक राहुल चित्तेला यांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि रजत कमळ देऊन सन्मानित करण्यात येईल.

4 / 5
'वाळवी' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे निर्माते मायासभा करमणूक मंडळी, झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेस लिमिटेड आणि दिग्दर्शक परेश मोकाशी यांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि रजत कमळ मिळेल.

5 / 5
सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या विभागातील विजेत्यांना स्वर्णकमळ आणि प्रत्येकी 3 लाख रुपये बक्षीस दिलं जाईल.