Photo : नवीनला अखेरचा निरोप, युक्रेनमधील गोळीबारात नवीनचा मृत्यू झाला होता, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वाहिली श्रध्दांजली
युक्रेनच्या खार्किव्ह शहरात झालेल्या गोळीबारात कर्नाटकातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. नवीन शेखरप्पा ग्यानगौदार असं त्याचं नाव होतं. त्याचं पार्थिव आज पहाटे 3 वाजता बंगळुरुमध्ये पोहचलंय. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी श्रध्दांजली वाहिली. 1 मार्चला नवीनचा रशियन हल्ल्यात मृत्यू झाला होता. नवीन युक्रेनमध्ये वैद्यकिय शिक्षणासाठी गेला होता. आज पहाटे बंगळुरू विमानतळावर नवीनचा मृतदेह आणण्यात आला. यानंतर नवीनचा मृतदेह कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी नेण्यात आला.