‘नवरा माझा नवसाचा 2’ची तगडी कमाई; जमवला इतक्या कोटींचा गल्ला
उत्तम गोष्ट, दमदार अभिनय, खुसखुशीत संवाद, श्रवणीय संगीत अशी मनोरंजनाची पुरेपूर मेजवानी या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. त्याचसोबत काही सरप्राइज गोष्टींचाही या चित्रपटात समावेश आहे.
1 / 5
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा 2' हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई चांगली होत आहे. 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.
2 / 5
या दुसऱ्या भागात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, अली असगर, विजय पाटकर, जयवंत वाडकर, संतोष पवार, हरिश दुधाडे,गणेश पवार अशी दमदार स्टारकास्ट पहायला मिळतेय.
3 / 5
'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाने आतापर्यंत 18.57 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 14.36 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाची कमाई 4.21 कोटी रुपयांची झाली.
4 / 5
‘नवरा माझा नवसाचा 2’मध्ये स्वप्नील जोशी-हेमल इंगळे ही जोडी सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची जावई, मुलगी अशा भूमिकेत आहे. सासऱ्यांनी ज्याप्रमाणे धडपड करून नवस फेडला, तसा आता जावयाला फेडता येतो का? याची धमाल गोष्ट या चित्रपटात पहायला मिळत आहे.
5 / 5
नवस फेडण्यासाठीच्या रेल्वे प्रवासात हिरे चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाचं कथानकही उलगडत आहे. त्यामुळे मनोरंजक आणि थरारक अनुभव प्रेक्षकांना मिळत आहे.