नवरात्रीचे उपवास करताना फॉलो करा या गोष्टी, तुमच्यासाठी खास 5 टिप्स!

| Updated on: Oct 13, 2023 | 2:24 PM

नवरात्र म्हटलं की दांडिया, गरबा, जल्लोष यासोबत असतो तो उपवास. नवरात्रीचा उपवास! हा उपवास अतिशय कडक असतो. या उपवासात बऱ्याच गोष्टी फॉलो केल्या जातात. इतक्या नियमांमध्ये नेमकं काय खायला हवं आणि काय नको? एखादा नवा माणूस असेल जो पहिल्यांदाच उपवास करतोय त्याने काय गोष्टी फॉलो कराव्यात. खाण्यामध्ये काय असावं, कमी खावं हे खरंय पण काय खावं? वाचा

1 / 5
दूध आणि दुधाचे पदार्थ: नवरात्रीचे उपवास कडक उपवास असतात. उपवास करताना तुम्ही दूध आणि दुधाचे पदार्थ खाऊ शकता, हे पदार्थ उपवासाला फायदेशीर असतात. याशिवाय तुम्ही उपवासात खजूर, फळे, गूळ, मध यांचा देखील समावेश करू शकता. भाजीमध्ये सुद्धा तुम्ही सैंधव मीठ टाकून ती भाजी खाऊ शकता. फळे आणि दूध ही उपवासाला कधीही चालणारी गोष्ट आहे.

2 / 5
जेवण स्वतः बनवा: नवरात्रीच्या उपवासात तुम्ही जे काही खाल ते स्वतः बनवून खा. स्वतः बनवलेलं जेवण हे आरोग्यदायी असतं. उपवास करताना आधीच ओढाताण होते त्यामुळे त्यात जर तुम्ही बाहेरचं अन्न खाल्लं तर ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे जेवण स्वतः बनवून खा.

3 / 5
उपवास ही एक प्रकारची श्रद्धा असते. देवीवर श्रद्धा असणारे सगळेच नवरात्रीत उपवास करतात यात महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. मग यात ज्या गरोदर महिला असतात त्यांनी विशेष काळजी घ्यावी. उपवास करताना गरोदर महिलांनी नारळाचं पाणी पित राहावं. काही अंतराने फळे सुद्धा खाल्ली जाऊ शकतात.

4 / 5
उपवासात डिहायड्रेशन खूप होतं. निरोगी राहण्यासाठी उपवासात सतत पाणी प्यायला हवं. सारखं पाणी प्यायल्याने शरीराला त्रास होत नाही. दिवसातून २-३ लिटर पाणी प्यायल्यास शरीर निरोगी राहते, उपवासात चक्कर येत नाही.

5 / 5
नवरात्रीचा काळ आणि उपवास! या कडक उपवासात सगळ्यात पोषक काय असेल तर ते आहे शेंगदाणे. शेंगदाण्यामुळे शरीराला खूप फायदा होतो. शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते हे आपल्याला माहीतच आहे. उपवासात कमी खायचं असतं त्यामुळे नारळ पाणी शेंगदाणे हे उपाय तुम्ही नक्कीच ठेऊ शकता.