“तो माझा पूर्व पती असला तरी..”; ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम एजेच्या पूर्व पत्नीचं मोठं वक्तव्य

| Updated on: Dec 22, 2024 | 9:46 AM

राकेशने अभिनेत्री रिधी डोग्राशी 2011 मध्ये लग्न केलं होतं. ‘मर्यादा’ या मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र लग्नाच्या सात वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. राकेशप्रमाणेच रिधीसुद्धा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. टीव्हीनंतर तिने वेब सीरिज आणि चित्रपटांकडेही आपला मोर्चा वळवला.

1 / 5
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत एजेची भूमिका साकारणारा अभिनेता राकेश बापट त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येतो. राकेशने प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रिधी डोग्राशी लग्न केलं होतं. मात्र 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

2 / 5
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिधीने खुलासा केला की, जरी लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला असला तरी, आजही जेव्हा तिच्यासमोर एखादी समस्या असते, तेव्हा ती पूर्व पती राकेशची मदत आवर्जून मागते.

3 / 5
"मी सहसा माझ्या समस्या कोणाला सांगत नाही. मात्र कोणाच्या पाठिंब्याने मी त्यांचा सामना करू शकते, हे मला माहित आहे. माझा भाऊ अक्षय डोग्रा माझी खूप साथ देतो. माझ्या तणावाला कसं हाताळायचं, हे त्याला चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. त्याशिवाय काही मित्रमैत्रिणीसुद्धा आहेत, ज्यांचा मी सल्ला घेते", असं रिधी म्हणाली.

4 / 5
याविषयी तिने पुढे सांगितलं, "निर्माती एकता कपूर माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मी तिच्याकडे कधी कधी मदत मागते. शाळेतील जुने मित्रसुद्धा माझ्या मदतीला धावून येतात. इतकंच नव्हे तर माझा पूर्व पती राकेश बापटसुद्धा माझी साथ देतो."

5 / 5
"राकेश माझा पूर्व पती असला तरी मला एखादी समस्या सतावत असेल तर मी त्याची मदत आवर्जून घेते. तो माझा पूर्व पती असला तरी माझा सर्वांत जवळचा मित्रसुद्धा आहे", असं रिधीने स्पष्ट केलं.