‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत रंजक ट्विस्ट; एजेच्या हॉटेलमध्ये लीला करणार वेटरची नोकरी
लीला किती काळ एजेच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम टिकवू शकेल? एकत्र काम करत असताना एजे-लीलाच नातं एक नवीन दिशा घेईल का? या प्रश्नांची उत्तर मालिकेच्या पुढील भागात मिळतील. 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.
1 / 5
'झी मराठी' वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर आलं आहे. लीला आणि एजेच्या आयुष्यात अनेक मनोरंजक किस्से घडताना दिसत आहेत.
2 / 5
कधी ती किडनॅपच होते तर कधी तिला केक खाण्याची शिक्षा होते. पण लीला संधीचं सोनं कसं करते हे पाहण्यात प्रेक्षकांना जास्त उत्सुकता असते. मालिकेत सध्या लीलाच्या घरच्यांना साळुंखेने पुन्हा त्रास द्यायला सुरूवात केली आहे.
3 / 5
रक्षाबंधनला साळुंखे घरात असताना एजे लीलाच्या घरी पोहोचतो आणि तिथे एजेला साळुंखेकडून घेतलेल्या लोनबद्दल कळतं. एजे ते लोनचे पैसे भरायचं ठरवतो. पण लीला ऐनवेळी येते आणि नकार देते.
4 / 5
दुसरीकडे एजेनं रेवतीचं रक्षण केलं म्हणून ती एजेला राखी बांधण्याचं ठरवते. एजे रेवतीला ओवाळणी म्हणून 18 लाख रुपयांचा चेक देतो. एजेचं हे वागणं एकीकडे लीलाला आवडतंय पण दुसरीकडे तिचा स्वाभिमानही दुखावला जात आहे.
5 / 5
ती एजेचे पैसे त्यांना परत करण्याचं ठरवते आणि वाटेल ते काम करायला तयार होते. लीलाची जिद्द पाहून एजे तिला आपल्या हॉटेलमध्ये काम करण्याचा सल्ला देतो. एजे लीलाला त्याच्या हॉटेलमध्ये वेटरचं काम करायला सांगतो.