PHOTO | कधी गोळीबार, तर कधी बॉम्बस्फोटाची भीती, महिलांवर निर्बंध असूनही झुंज, बॅले डान्सर नाजिक अल-अलीची प्रेरणादायी कहाणी
जगभरात नाव कमवणारी बॅले डान्सर नाजिक अल-अली (Nazik al ali ) ही 21 वर्षीय तरुणी महिला आणि कलाकारांसाठी एक आदर्श आहे .
दमास्कमधील संघर्षानंतर तिची सुरुवातीला कुर्दिश फोक डान्सर ग्रुपच्या माध्यमातून अनेक डान्सरसोबत ओळख झाली. तिथूनच नाजिकच्या बॅले डान्सचा प्रवास सुरु झाला.
Follow us on
सीरिया देशात प्रचंड अस्थिरता आहे. अतिरेक्यांकडून केव्हा गोळीबार किंवा बॉम्बस्फोट होईल याची शक्यता नाही. याशिवाय सीरियात महिलांवर प्रचंड निर्बंध आहेत. तिथे खाण्यापासून ते कपडे परिधान करण्याबाबत वेगवेगळे निर्बंध आहेत. मात्र, अशा वातावरणातून पुढे येऊन जगभरात नाव कमवणारी बॅले डान्सर नाजिक अल-अली ही 21 वर्षीय तरुणी महिला आणि कलाकारांसाठी एक आदर्श उदाहरण आहे.
नाजिक अल-अली ही सीरियातील एकमेव बॅले डान्सर आहे. तिने नुकतंच 28 डिसेंबर 2020 रोजी सीरियातीच्या हस्के प्रांतात कुर्द शहरात मौन डान्स केला होता. त्यानंतर नववर्षात तिने डान्स न करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाजिकचा जन्म कामिशली भागात झाला. तिने कुर्द प्रांतात डान्स केला. त्या भागात अनेकदा घातपाताच्या घटना घडल्या आहेत. वारंवार होणाऱ्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर तिने नव्या वर्षात डान्स न करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सर्वांना शांततेचा संदेश दिला आहे.
“2020 वर्षात खूप कठीण प्रसंगातून जावं लागलं. या प्रसंगामुळे माझं मनोधैर्यही खालावलं”, असं नाजिकने सांगितलं
दमास्कमधील संघर्षानंतर तिची सुरुवातीला कुर्दिश फोक डान्सर ग्रुपच्या माध्यमातून अनेक डान्सरसोबत ओळख झाली. तिथूनच नाजिकच्या बॅले डान्सचा प्रवास सुरु झाला.
नाजिकने अनेक संवेदनशील भागांमध्ये, जिथे दहशतवादी हल्ल्याची जास्त शक्यता होती, अशा भागात डान्स केला आहे.