Dwight Howard in Varanasi: NBA चा स्टार बास्केटबॉलपटू काशीमध्ये, गंगा आरती पाहून भारावला, पंतप्रधान मोदींच भरभरुन कौतुक

| Updated on: Apr 28, 2022 | 8:04 PM

Dwight Howard in Varanasi: उत्तर प्रदेशातील वाराणसी शहराकडे भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून पाहिलं जातं. भारतातूनच नव्हे, तर जगभरातून लोक वाराणसी फिरण्यासाठी येतात.

1 / 5
उत्तर प्रदेशातील वाराणसी शहराकडे भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून पाहिलं जातं. भारतातूनच नव्हे, तर जगभरातून लोक वाराणसी फिरण्यासाठी येतात. वाराणसीतील वेगवेगळे घाट, मंदिरं पाहून मनाला एक वेगळी शांती मिळते.

2 / 5
अमेरिकेचा स्टार बास्केटबॉल प्लेयर ड्वाइट होवार्डही आता वाराणसी नगरीच्या प्रेमात पडला आहे. सध्या तो वाराणसीत भ्रमंती करतोय. ड्वाइट होवार्ड हे बास्केटबॉल खेळातलं एक मोठं नाव आहे.

3 / 5
NBA मध्ये त्याने आपला जलवा दाखवला आहे. ड्वाइट सध्या वाराणसीमध्ये आहे. तिथले अनेक फोटो त्याने शेअर केले आहेत.

4 / 5
वाराणसीच्या घाटावर तो गंगा आरतीचा आनंद घेतोय. स्थानिकांबरोबरही त्याने संवाद साधला. NBA मधील या स्टार खेळाडूने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भरपूर कौतुक केलं. वाराणसीत आल्यानंतर मनाला एक वेगळी शांती मिळाली, हा एक अध्यात्मिक प्रवास आहे. या शानदार शहराचं ट्रान्सफॉर्मेशन घडवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन, असं ड्वाइट होवार्डने म्हटलं आहे.

5 / 5
ड्वाइटने वाराणसीमधील गंगा आरतीचे, नावेतून फिरतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. त्याने स्थानिक पोलिसाबरोबरही फोटो काढले आहेत. ड्वाइटचे मित्र आणि अन्य खेळाडू सुद्धा त्याच्यासोबत वाराणसीत आले आहेत.