Marathi News Photo gallery Ncp leader jitendra awhad controversial statement on prabhu sriram nashik kalaram temple Mahant Sudhirdas Maharaj reaction on it ram non vegetarian ayodhya ram temple mandir
Ayodhya Ram Mandir | ‘राक्षसांना जसा त्रास होतो, तसाच…’, रामाबद्दल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना चांगलच सुनावलं
Ayodhya Ram Mandir | राम मंदिराच्या उद्घाटनाचे दिवस जवळ येत असताना वेगवेगळी वक्तव्य समोर येऊ लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांबद्दल असच एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला.
1 / 5
“राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?” असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
2 / 5
शिर्डीत दोन दिवसीय शिबीरात जितेंद्र आव्हाड हे बोलले. त्यांच्या या वक्तव्याचा नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी चांगलाच समाचार घेतलाय.
3 / 5
"जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात जे उद्गगार काढले, प्रभू रामचंद्र मांसाहारी होते, प्रभू रामचंद्रांनी शिकार करुन वनवास कालखंड व्यत्तीत केला हे अत्यंत मूर्खपणाच विधान आहे"
4 / 5
"वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही चौदा रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा उल्लेख नाही. कंदमुळ खाऊन ब्रह्मचर्य धारण करुन प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात राहिले"
5 / 5
"आज भारतात राममय वातावरण झालेलं असताना राक्षसांना जसा त्रास होतो, त्याच पद्धतीचा त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतोय, त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो" असं महंत सुधीरदास महाराज यांनी म्हटलय.