घरगुती सिलिंडर हा वजनाने फार जड असतो. त्यामुळे तो उचलताना नाकी नऊ येतात. मात्र आता आपल्याला जड सिलिंडरपासून आराम मिळणार आहे. पण यासाठी आपल्याला फक्त नवीन फायबर मेड कंपोझिट सिलिंडर घरी आणावा लागेल. इंडियन ऑईल 5 किलो आणि 10 किलो फायबरचे बनलेले संमिश्र एलपीजी सिलिंडर निर्मिती करत आहे. हे सध्याच्या सिलिंडरपेक्षा अधिक सुरक्षित आणि वजनाने हलका आहे.
सध्याच्या सिलिंडरमध्ये 14.2 किलो गॅस असतो. तसेच अगदी पाच किलोचे छोटे सिलिंडर्सही उपलब्ध असतात. मात्र आता फायबरपासून बनवलेले संयुक्त सिलिंडर पहिल्यांदा लोकांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचणार आहे.
फायबरयुक्त गॅस सिलिंडर हे सध्याच्या गॅस सिलिंडरच्या तुलनेत 50 टक्के हलके असतात. तसेच त्याची डिझाईनही आकर्षक असते. हा सिलिंडरला गंज लागत नाही. मात्र सध्या वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सिलिंडरमध्ये ते लवकर गंजण्याचा धोका असतो.
फायबरयुक्त गॅस सिलिंडर जास्तीत जास्त 10 किलो गॅस असतो. या सिलेंडरचा काही भाग पारदर्शक असतो. त्यामुळे जेणेकरून सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, ते आपण सहजपणे पाहू शकाल. तसेच खरेदीच्या वेळी गॅसची पातळी देखील पाहता येते.
यात 10 किलो कंपोझिट सिलिंडरसाठी 3350 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरावे लागेल. त्याचवेळी 5 किलो सिलिंडरची सुरक्षा ठेव म्हणून 2150 रुपये आहे. या गॅस सिलिंडरची होम डिलिव्हरीही दिली जाते. सध्या हे केवळ दिल्ली, गुरुग्राम, हैदराबाद, फरिदाबाद आणि लुधियाणा मधील निवडक वितरकांकडे उपलब्ध आहेत.