‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट; गुरुमातेकडून वसुंधरेला शिक्षा
ही शिक्षा ऐकून तनया आणखी काही नवीन कट रचेल का? गुरुमातेच्या दिलेल्या शिक्षेवर कोणती सून खरी उतरेल? या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील. 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होते.
1 / 7
झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत गुरुमाता ठाकूरांच्या घरी येते आणि संपूर्ण कुटुंब तिचं मोठ्या जल्लोषात स्वागत करतं. ती जयश्रीला पाणी आणायला सांगते, पण पाणी चाखल्यानंतर ते अशुद्ध असल्याचं जाहीर करून ग्लास फेकून देते.
2 / 7
पुढे गुरुमाता जयश्रीला प्रश्न विचारत तिला चौकशीच्या फेऱ्यात अडकवते. गुरुमाता वसुंधराला बोलावून तिला रोजच्या दिनचर्येबद्दल समजावतात. वसुंधरा लवकर उठून गुरुमातेनं सांगितलेले सर्व विधी पाळण्याचं वचन देते.
3 / 7
गुरुमाता तिला इशारा देते की जर चूक झाली, तर त्यासाठी प्रायश्चित्त घ्यावं लागेल. तनया हे संभाषण गुपचूप ऐकते. वसुंधरा आपली दिनचर्या सुरू करते, तर तनया तिच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करते. मात्र, गुरुमाता योग्य वेळी येऊन वसुंधराला थांबवते.
4 / 7
गुरुमाता वसुंधराचा नैवेद्य स्वीकारते आणि तिच्या तयारीचं कौतुक करते. अनपेक्षितपणे जयश्रीही वसुंधराचं कौतुक करते. यावर गुरुमाता म्हणतात एकदा चांगलं काम केल्यावर त्यात रोज सातत्य राखलं जाईल याची खात्री देता येत नाही.
5 / 7
इकडे वसुंधराला ताप आलाय आणि आकाश तिची रात्रभर काळजी घेतोय. वसुंधरा सकाळी उठल्यानंतर तिला कळतं की ती आपल्या कर्तव्यात चुकली आहे आणि ती गुरुमातेकडे माफी मागण्यासाठी जाते.
6 / 7
वसुंधरा स्वयंपाक करत असताना आकाश तिला मदत करण्यासाठी प्रयत्न करतोय. तनया संधी साधून वसुंधराच्या डिशमध्ये लसूण पेस्ट घालते. इकडे शिष्य गुरु मातेला जेवण वाढतात आणि लसणाचा वास लागताच गुरु माता संतापते.
7 / 7
तनया खोटं बोलून वसुंधरावर लसूण घालण्याचा आरोप करते. आता गुरुमाता दोन्ही सुनांना कठोर शिक्षा देणार आहेत. त्यांना जलसमाधी घ्यावं लागणार आहे.