देशाच्या अर्थमंत्र्यांच्या मुलीचे लग्न, पण VIP नाही अन् नेताही नाही
Nirmala Sitharaman Daughter Wedding : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मुलीचा विवाह सोहळा झाला. विवाह सोहळ्यात एकही सेलिब्रिटी नव्हते. व्हिआयपी नव्हते. कोणताही नेता नव्हता. अगदी साध्या पद्धतीने विवाह समारंभ झाला.
1 / 6
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांची मुलगी परकला वांगमयी हिचा विवाह केला. हा विवाह सोहळा अगदी साधेपणाने झाला. बंगळुरू येथील त्यांच्या घरी लग्नाचे विधी पार पडले. लग्नसोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि खास मित्रमंडळीच उपस्थित होती.
2 / 6
परकला हिच्या लग्नात कोणत्याही नेत्याला किंवा व्हीआयपी पाहुण्याला आमंत्रित करण्यात आले नव्हते. सीतारामन यांचे जावई प्रतीक दोशी हे गुजरातचे रहिवासी आहेत. ते पीएमओमध्ये ओएसडी आहेत.
3 / 6
सीतारामन यांची मुलगी परकला आणि प्रतीक यांचा विवाह ब्राह्मण परंपरेने झाला. उडुपी अदमारू मठाच्या संतांनी जोडप्याला आशीर्वाद दिले आणि लग्नाचे सर्व विधी पार पाडले. परकलाने लग्नासाठी गुलाबी रंगाची साडी नेसली होती, तर प्रतीकने पांढरा पंच आणि शाल परिधान केली होती.
4 / 6
सीतारामन यांनी मोलाकलमुरू साडी नेसली होती. सीतारामन यांचे जावई प्रतीक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी आहेत. ते पंतप्रधान कार्यालयात विशेष कर्तव्य अधिकारी म्हणजेच ओएसडी आहेत. ते 2014 पासून पीएमओमध्ये कार्यरत आहेत. त्यांना 2019 मध्ये सहसचिव पद देण्यात आले आणि त्यांना ओएसडी बनवण्यात आले.
5 / 6
प्रतीक हा सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलचा पदवीधर आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्रतीक त्यांच्या कार्यालयात होते. निर्मला यांची कन्या परकला वांगमयी मिंट लाउंजमध्ये फीचर रायटर आहे.
6 / 6
तिने दिल्ली विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी मेडिल स्कूल ऑफ जर्नलिझम, नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी, यूएसए येथेही शिक्षण घेतले.