एखाद्या ‘महल’पेक्षा कमी नाही नीता अंबानी यांचा प्राइव्हेट जेट, फोटो पाहून म्हणाल…
Nita Ambani Private Jet Costing: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आपल्या शानदार जीवनशैलीसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या पत्नी नीता अंबानी सामाजिक कार्यात सहभागी असतात. त्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या फाउंडर आहेत.
1 / 5
नीता अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय प्रवास आरामदायक करण्यासाठी मुकेश अंबानी यांनी त्यांना एक खासगी जेट विमान गिफ्ट दिले. 2007 मध्ये नीता अंबानी यांच्या वाढदिवशी मुकेश अंबानी यांनी 230 कोटींचा कस्टम-फिटेड एयरबस 319 (Airbus 319) त्यांना गिफ्ट दिले.
2 / 5
नीता अंबानी यांच्या या जेटमध्ये अनेक सुविधा आहेत. एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या या सुविधा दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा संपूर्ण तपास आरामदायक होतो. या जेटमध्ये दहा ते बारा लोक बसू शकतात, अशी व्यवस्था केली गेली आहे.
3 / 5
जेटमध्ये एक मास्टर बेडरुम आहे. त्याला एक टॉयलेट अटॅच आहे. लांबचा प्रवास असताना त्यात तुम्ही आराम करु शकतात. या जेटमध्ये मनोरंजन आणि गेमिंगची पूर्ण व्यवस्था केली गेली आहे. त्यात म्यूजिक सिस्टम, सेटेलाइट टेलीव्हिजन आणि वायरलेस कम्युनिकेशन या सुविधा आहेत.
4 / 5
विमानात एक डायनिंग हॉल आहे. विमानात एक स्काई बारसुद्धा आहे. मुकेश अंबानी बोइंग बिजनेस जेटने प्रवास करतात. तर नीता अंबानी आपल्या खासगी जेटने प्रवास करण्यास प्राधान्य देतात.
5 / 5
अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या दरम्यान हा प्रायव्हेट जेट चर्चेत आला होता. आध्यात्मिक गुरु आणि कथाकार धीरेंद्र शास्त्री यांना या लग्नात येण्या-जाण्यासाठी खासगी जेट विमानाची ऑफर केली होती. त्यानंतर त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला.