जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी साईबाबांचे दर्शन घेतले आहे. शिर्डीत जाऊन त्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाल्या आहेत.
नीता अंबानी यांच्या आई पौर्णिमा दलाल यादेखील नीता अंबानी यांच्यासोबत साई दर्शनाला शिर्डीमध्ये पोहोचल्या होत्या. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स हा संघ नीता अंबानी यांच्या मालकीचा आहे. आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली यांच्यात सामना आहे.
यापूर्वी नीता अंबानी यांनी मुंबई इंडियन्स उपांत्य फेरीत पोहचल्यावर सामन्यावेळीच साईबाबांचे दर्शन घेतले होते. आयपीएलच्या या हंगामात मात्र मुंबई इंडियन्सने खराब कामगिरी केली आहे.
असे असतानाच नीता अंबानी या साईबाबांचे दर्शन घेऊन बाहेर पडताच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी त्यांच्यापुढे एक आगळीवेगळी मागणी केली आहे.
नीता अंबानी या साईबाबांचे दर्शन घेऊन बाहेर पडलताच मुंबई संघांच्या चाहत्यांनी क्रिकेटर रोहित शर्माला मुंबई संघाचा कर्णधार करा अशी मागणी केली.
चाहत्यांच्या या मागणीवर नीता अंबानी यांनी हात जोडत 'बाबा की मर्जी...' असं उत्तर दिलं. नीता अंबानी यांच्या या उत्तराची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.