नितीन देसाई यांच्या निधनानंतर सिनेविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे.. असं म्हणायला हरकत नाही. नितीन देसाई यांच्यावर सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
नितीन देसाई यांचा मृतदेह एनडी स्टुडिओमध्ये आणण्यात आला आहे. त्यांच्या अंत्यदर्शनाला कलाकारांची गर्दी झाली असून कुटुंबिय देखील भावुक झाले आहेत.
नितीन देसाई यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नितीन देसाई यांचं अंत्यदर्शन घेतलं आहे.
नितीन देसाई यांच्या निधनानंतर कुटुंबिय देखील एनडी स्टुडिओ याठिकाणी दाखल झाले आहेत. नितीन देसाई यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
वाढदिवसाच्या चार दिवस आधी नितीन देसाई यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. ९ ऑगस्ट रोजी नितीन देसाई यांचा वाढदिवस आहे.