देशातील टोलनाके बंद होणार, जाणून घ्या वाहनांचा टोल कसा वसूल करणार?
GPS toll tracking System | सध्याच्या घडीला देशभरात ट्रॅकिंग टोल टेक्नॉलॉजी उपलब्ध नाही. सध्या भारताकडून हे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. या सुविधेमुळे देशभरात टोलनाके पूर्णपणे बंद होतील.
-
-
देशभरातील टोलनाक्यांसाठी केंद्र सरकार लवकरच एक नवे धोरण लागू करणार आहे. या धोरणानुसार आता टोलनाक्यांवर जीपीएसवर आधारित ट्रॅकिंग सिस्टम असेल.
-
-
सध्याच्या घडीला देशभरात ट्रॅकिंग टोल टेक्नॉलॉजी उपलब्ध नाही. सध्या भारताकडून हे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. या सुविधेमुळे देशभरात टोलनाके पूर्णपणे बंद होतील. केवळ जीपीएस टोल सिस्टीमच्या माध्यमातून वाहनचालकांकडून टोल आकारला जाईल.
-
-
देशभरात जीपीएसवर आधारित ट्रॅकिंग सिस्टम अस्तित्वात आल्यानंतर टोलनाक्यांवर कर्मचाऱ्यांची गरज उरणार नाही. मुळात टोलनाकेच ठेवावे लागणार नाहीत. टोल ट्रँकिंगच्या रशियन तंत्रज्ञानामुळे तुमची गाडी कोणत्या हद्दीत आहे, हे समजेल.
-
-
जीपीएस इमेजिंगचा वापर करुन संबंधित वाहनचालकाच्या ई-वॉलेटमधून टोलची रक्कम कापली जाईल. सध्याच्या नवीन वाहनांमध्ये जीपीएस सिस्टीम असल्यामुळे हे काम सोपे होईल. तर जुन्या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवणे बंधनकारक केले जाईल.
-
-
नव्या धोरणानुसार आता टोलनाक्यांवर जीपीएसवर आधारित ट्रॅकिंग सिस्टम असेल. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली.
-
-
यामुळे टोलनाक्यांवर होणारा वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय आणखी कमी होण्यास मदत होईल.