आज वैशाख शुद्ध मोहिनी भागवत एकादशी आहे. या निमित्ताने पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सुंदर मोगऱ्याच्या फुलांनी सजवण्यात आले आहे. मोहिनी भागवत एकादशीचा आजचा हा मुहूर्त शेकडो वर्षांनी येतो. या दिवशी अनेक भाविक उपवास देखील करतात.
कोरोना संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन मंदिरात जाऊन भाविकांना घेता येत नसलं तरी या माध्यमातून आपण ही देवाच मनमोहक रूप घर बसल्या पाहू शकतो.
श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा गाभारा चौखांबी हा सर्व परिसर मोगर्याच्या सुगंधाने दरवळला आहे. युगायुगातून आलेला हा दुर्मिळ योग असून आज एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी असा योग आला आहे.
मोगरा झेंडू गुलाब अशा विविध फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. आजच्या या योगाला त्रिस्पृशा महाद्वादशी असेही म्हटंले जाते.
रांजणगाव येथील भाविक नानासाहेब पाटील यांनी ही सजावट केलेली आहे.
या मोगऱ्यांच्या फुलांच्या सजावटमुळे मंदिराचा सर्व परिसर प्रसन्न दिसत आहे.
दरवर्षी मोहिनी भागवत एकादशी निमित्त आकर्षक सजावट ही केली जाते.
मोहिनी भागवत एकादशी निमित्त भाविक दरवर्षी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात.