चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे 'गुढीपाडवा'. हिंदू आणि मराठी कॅलेंडर प्रमाणे ही नववर्षांची सुरूवात असते. म्हणूनच हिंदू सणांपैकी गुढीपाडवा (Gudi Padwa) या सणाला विशेष महत्व आहे.
या सणादिवशी आपल्या घराबाहेर कलश, बत्ताशे, कडुलिंबाची पाने लावून गुढी उभारली जाते आणि पारंपारिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले जाते.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांनी सकाळपासून गर्दी केलीय आहे. नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने व्हावी यासाठी भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली. सकाळ पासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली
सकाळपासून मंदिरात गणेश मंत्राचा जयघोष ऐकायला मिळाला. 2 वर्ष कोरोनात गेल्यामुळे यंदा गुढी उत्साह पाहायला मिळाला. आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्कृतीक शहर पुण्यामधील आजचे वातावरण अगदी मंत्रमुग्ध करणारे आहे. सकाळपासूनच लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.