कचरा समजल्या जाणाऱ्या कांद्याच्या सालीचे फायदे! वाचा
कांद्याची साल आपण फेकून देतो तो आपल्यासाठी कचरा असतो. खूप कमी लोकांना हे माहित आहे की कांद्याच्या सालीचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. हृदयविकाराचा झटका रोखण्यापासून ते केसगळती थांबवण्यापर्यंत हे फायदे आहेत. हे फायदे वाचा, तुम्ही या नंतर चुकूनही कांद्याची साल फेकून देणार नाही. जाणून घेऊयात कांद्याच्या सालीचे फायदे...
1 / 5
कांदा तर आरोग्यासाठी चांगला असतोच त्यात काही शंकाच नाही पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की कांद्याची साल आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते. पण तिचा वापर कशा पद्धतीने करावा? चला बघुयात...
2 / 5
कांद्याच्या सालीचा उपयोग हृदय विकार रोखण्यासाठी होतो. तुम्हालाही हे वाचून धक्का बसला असेल पण होय, हृदयविकाराचा झटका धोका कमी करण्यासाठी कांद्याच्या सालीचा वापर होऊ शकतो. एका कढईत कांद्याची साल टाका त्यात स्वच्छ पाणी घाला. हे पाणी कमी गॅसवर उकळून घ्या, ते गाळून घ्या, कोमट झाल्यावर प्या.
3 / 5
कांद्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. बदलत्या हवामानात व्हायरल इन्फेक्शनचा खूप धोका असतो. वातावरण बदललं की इन्फेक्शन होतं, कशामुळे? रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्याने हे होतं. कांद्याची साल पाण्यात टाकून पाणी उकळून घ्या ते पाणी फिल्टर करून प्या.
4 / 5
आपल्या डोळ्यांना व्हिटॅमिन ए ची गरज असते. कांद्याच्या साली मध्ये व्हिटॅमिन ए म्हणजेच रेटिनॉल असतं याची कमतरता असेल तर डोळे कमकुवत होतात. कांद्याच्या सालीच्या मदतीने तुमची दृष्टी चांगली होऊ शकते. ही साल पाण्यात उकळून घ्या आणि प्या.
5 / 5
तुम्हाला आश्चर्य वाटेल कांद्याची साल लांब आणि दाट केसांसाठी उपयुक्त ठरते. कांद्याची साल जर पाण्यात भिजवून ठेवली तर त्याचा फायदा होईल. काय करायचं ते आम्ही सांगतो, पाण्यात कांद्याचे साल टाका, सुमारे एक तास ते भिजत ठेवा आणि नंतर त्याच पाण्याने केस धुवा.