Marathi News Photo gallery Orry aka orhan awatramani enters in bigg boss 17 salman khan shocked after hearing his luxury lifestyle
9 लाखांचं घड्याळ, दीड लाखाचे शूज, 5 मॅनेजर.. ऑरीची लाइफस्टाइल पाहून सलमानही थक्क!
बिग बॉसच्या घरात नुकतीच वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. या वाईल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे ओरहान अवत्रमणी याने बिग बॉसच्या घरात एण्ट्री केली आहे. ओरहानविषयी नेटकऱ्यांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. तो काय काम करतो, इतके सेलिब्रिटी त्याला कसे ओळखतात, या प्रश्नांची उत्तर आता बिग बॉसच्या घरात मिळतील.
1 / 10
'बिग बॉस 17' हा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. यातील स्पर्धक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतायत. आता मनोरंजनाचा हा डोस डबल करण्यासाठी बिग बॉसच्या घरात आणखी एक स्पर्धक दाखल झाला आहे. नुकतीच या शोमध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली.
2 / 10
प्रत्येक सेलिब्रिटी आणि स्टारकिडसोबत दिसणारा चेहरा ओरहान अवत्रमणी उर्फ ऑरी हा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी ऑरीने बरंच सामान आपल्यासोबत आणलं आहे. त्याचे बॅग्स पाहून सलमानलाही हसू अनावर झालं.
3 / 10
"आम्ही या शोमध्ये स्पर्धकाला अत्यंत सन्मानाने पाठवतो, पण तुला इतक्या सामानासह पाठवावं लागणार आहे", असं म्हणत सलमान ऑरीचं स्वागत करतो. यानंतर सलमान म्हणतो की, "संपूर्ण जगाला माहितीये की तू काय काम करतोस?"
4 / 10
ऑरी सलमानला म्हणतो, "संपूर्ण जगाला माहीत आहे की मी काय काम करतो. मी तुम्हालाही सांगू इच्छितो की मी खूप काम करतो. मी सकाळी सूर्यासोबत उठतो, रात्री चंद्रासोबत झोपतो." ऑरीचं हे उत्तर ऐकून सलमान जोरजोरात हसू लागतो.
5 / 10
सलमान पुढे ऑरीला विचारतो की, "लोकांना हेसुद्धा जाणून घ्यायचं आहे की तुला पार्टीमध्ये जाण्याचे पैसे मिळतात का?" त्यावर ऑरी स्पष्ट करतो की त्याच्या मॅनेजरकडे आमंत्रण देऊन त्याला पार्ट्यांमध्ये बोलावलं जातं. मॅनेजर हा शब्द ऐकून सलमान चकीत होतो. तेव्हा ऑरी म्हणतो, "होय, माझे पाच मॅनेजर आहेत."
6 / 10
ऑरी अत्यंत आलिशान आयुष्य जगतो. बिग बॉसमध्येही तो बरंच सामान घेऊन पोहोचला आहे. नुकतंच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ऑरीने सांगितलंय की त्याच्याकडे 9 लाख 80 हजारांचं घड्याळ आणि दीड लाखांचे शूज आहेत.
7 / 10
बॉलिवूडचे स्टारकिड्स जान्हवी कपूर, सारा अली खान, सुहाना खान, न्यासा देवगण यांच्यासोबत दरवेळी पार्ट्यांमध्ये एक चेहरा पहायला मिळतो. हा चेहरा म्हणजे ओरहान अवत्रमणी. बॉलिवूडमधल्या प्रत्येक स्टारकिड्ससोबत त्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये त्याच्याविषयी कुतूहल निर्माण झालं.
8 / 10
हा ओरहान नक्की आहे तरी कोण, तो काय काम करतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो इतक्या स्टारकिड्सना ओळखतो तरी कसा, असा प्रश्न अनेकांना पडलाय. या सर्व प्रश्नांची उत्तर आता बिग बॉसच्या घरात तरी मिळतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
9 / 10
ओरहान हा त्याच्या बॉलिवूड स्टारकिड्सच्या मित्रमैत्रिणींमध्ये ओरी म्हणून ओळखला जातो. त्याचे सततचे पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ पाहून तो काही काम करतो की नाही, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.
10 / 10
ओरहानचे प्रत्येक सेलिब्रिटीसोबत फोटो आणि व्हिडीओ तर आजवर नेटकऱ्यांनी पाहिले असतील. आता बिग बॉसच्या घरात त्याचा स्वभाव, तो कसा वागतो आणि बोलतो.. हे सर्व नेटकऱ्यांना पहायला मिळणार आहे.