अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तिने बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी बऱ्याच रंजक गोष्टी सांगितल्या आहेत.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत पलक तिवारीला प्रश्न विचारण्यात आला होता की, आर्यन खान कसा आहे? त्यावर ती म्हणाली, "तो अगदी तसाच आहे, जसा तो दिसतो. तो खूप कमी बोलतो मात्र जे बोलते ते फारच कामाचं असतं आणि पुन्हा तो त्याच्या कामात व्यस्त होतो."
"तो तसाच आहे. आर्यन फार प्रेमळ आणि शांत राहणारा मुलगा आहे. तो पार्ट्यांमध्येही स्वत:मध्येच मग्न असतो. जर तुम्ही त्याच्याशी बोलतात, तरच तो तुमच्याशी बोलतो. आर्यन खान हा मितभाषी आहे", असंही तिने पुढे सांगितलं.
पलक तिवारीने गायक हार्डी संधूच्या 'बिजली' या गाण्यातून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या गाण्याला नेटकऱ्यांनी खूप पसंत केलं. आता ती लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
'किसी का भाई किसी की जान' हा तिचा पहिलावहिला बॉलिवूड चित्रपट येत्या 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 'वीरम' या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे.