शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काय खावं? वाचा
रक्ताची कमतरता असेल तर डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. औषधांव्यतिरिक्त रुग्णाला डाळिंब खायला द्यावे. डाळिंबामध्ये प्लेटलेट्सची संख्या वाढवणारे घटक असतात. डाळिंब आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोह भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. डाळिंबामध्ये आढळणारे आवश्यक मिनरल्स आणि इम्युनिटी बूस्टर न्यूट्रिएंट्स तुम्हाला ताकद देतात.
1 / 5
बदलत्या ऋतूत डेंग्यू आणि मलेरियाचा धोका असतो. डेंग्यूचा आजार झपाट्याने पसरतो. डेंग्यूमध्ये ताप, सर्दी, खोकला या सगळ्याचा प्रचंड त्रास होतो. डेंग्यू जेव्हा बरा होतो त्यानंतर सुद्धा शरीरात रक्ताची कमतरता असते. बरेचदा तर प्लेटलेट्सची संख्या सुद्धा कमी झालेली असते. हे सगळं भरून काढण्यासाठी, डेंग्यू मधून रिकव्हर होण्यासाठी डॉक्टरांकडून सल्ले दिले जातात.
2 / 5
डेंग्यू आजारात रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते. यासोबतच डिहायड्रेशनसुद्धा होते. आज आपण असे पदार्थ बघणार आहोत जे खाल्ल्याने तुमचे प्लेटलेट्स वाढू शकतात. या पदार्थांचा तुम्ही रोज आहारात समावेश करू शकता.
3 / 5
व्हिटॅमिन सी खाल्ल्याने शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढते संत्री, आवळा, लिंबू असे व्हिटॅमिन सी चे पदार्थ खाल्ल्याने खूप फायदा होतो, प्लेटलेट्स वाढवतात.
4 / 5
मनुका शरीरातील रक्त वाढविण्यासाठी रात्रभर मनुके पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठून ते खा. ॲनिमियासारख्या आजारात मुनका खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने शरीरातील कमी झालेल्या प्लेटलेट्स झपाट्याने वाढतील. मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले आहे.
5 / 5
डाळिंब: रक्ताची कमतरता असेल तर डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. औषधांव्यतिरिक्त रुग्णाला डाळिंब खायला द्यावे. डाळिंबामध्ये प्लेटलेट्सची संख्या वाढवणारे घटक असतात. डाळिंब आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोह भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. डाळिंबामध्ये आढळणारे आवश्यक मिनरल्स आणि इम्युनिटी बूस्टर न्यूट्रिएंट्स तुम्हाला ताकद देतात.