‘पंचायत 3’च्या सचिवजींची खऱ्या आयुष्यात किती संपत्ती? सीरिजसाठी घेतलं इतकं मानधन

| Updated on: Jun 03, 2024 | 1:29 PM

कथेची साधीसरळ मांडणी, गावातील आयुष्य आणि साधेभोळे लोक.. या संकल्पनेवर आधारित 'पंचायत' ही सीरिज तुफान गाजली. पहिल्या दोन सीरिजच्या यशानंतर 'पंचायत'चा तिसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सीरिजमध्ये जितेंद्र कुमारने सचिवजींची भूमिका साकारली.

1 / 5
प्राइम व्हिडीओवरील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत'चा तिसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीरिजमधील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आयआयटी खडगपूरचा माजी विद्यार्थी जितेंद्र कुमारला या सीरिजमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली.

2 / 5
जितेंद्रला टीव्हीएफच्या युट्यूब व्हिडीओमुळे प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्याने 'पिचर्स' आणि 'कोटा फॅक्ट्री' या वेब सीरिजमध्ये काम केलं. जितेंद्रने 'शुभमंगल सावधान', 'ड्राय डे', 'चमन बहार' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

3 / 5
जितेंद्र कुमारचं मुंबईत एक घर आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये 88.18 लाख रुपयांची मर्सिडीज बेंज जीएलएस 350 डी, 82.10 लाख रुपयांची मर्सिडीज बेंज ई-क्लास, 48.43 लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर आणि 42 लाख रुपयांची मिनी कंट्रीमॅन यांचा समावेश आहे.

4 / 5
जितेंद्रला 'पंचायत'च्या प्रत्येक एपिसोडला 70 हजार रुपये मानधन मिळायचं. तिसऱ्या सिझनमधून त्याने 5.6 लाख रुपये कमावले आहेत. वेब सीरिज आणि चित्रपटांशिवाय जितेंद्रची कमाई जाहिरातींमधूनही होते.

5 / 5
'पंचायत'मधील सचिवजी म्हणजेत जितेंद्र कुमारची एकूण संपत्ती 7 कोटींच्या घरात आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 17 लाख फॉलोअर्स आहेत.