पॅरिस सेंट जर्मन क्लबचा स्टार फुटबॉलपटू माउरो इकार्डीची पत्नी वांडा नाराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती सध्या कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. तिने सुट्टी काळातील काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
वांडा नारा बिकिनीमध्ये बीच साइड पूल जवळ एन्जॉय करताना दिसतेय. या फोटो मध्ये तिची टॅन बॉडी दिसतेय. नारा पतीसोबत आपल्या लग्नाचा 8 वा वाढदिवस साजरा करतेय.
नारा पेशाने मॉडेल आहे. सोशल मीडियावर ती सतत तिच्या बिकिनी लूक मधले फोटो शेअर करत असते. बिकिनी मध्ये फोटो शेअर करताना तिने, नेहमीच उन्हाळा हवं, असं म्हटलं आहे.
माउरो इकार्डी बद्दल बोलायच झाल्यास, तो दर आठवड्याला 1.60 कोटी रुपये कमावतो. नाराच इकार्डी बरोबर हे दुसरं लग्न आहे. इकार्डीच्या प्रेमात पडल्यानंतर नाराने पहिला नवरा मॅक्सी लोपेजला घटस्फोट दिला.
माउरो इकार्डी, वांडा नारासोबत त्यांची पाच मुलही सुट्टया एन्जॉय करतायत. वांडा नाराचं सौंदर्य घायाळ करणारं आहे.