Marathi News Photo gallery Passport Colour Code Do you know the meaning of blue, white, maroon and orange passports? Which person gets which passport?
Passport Colour Code : निळा, मरुन, पांढरा आणि नारंगी रंगाच्या पासपोर्टचा अर्थ काय, कुणाला कोणता पासपोर्ट मिळतो?
देशाबाहेर पासपोर्ट हा एक घटकच तुम्ही भारतीय नागरिक असल्याचा सर्वात मोठा पुरावा असतो. सर्वसामान्य नागरिकांना निळ्या रंगाचा पासपोर्ट मिळतो. पण तुम्हाला माहिती आहे का की निळ्या रंगाच्या पासपोर्टसह मरुन, पांढरा आणि नारंगी रंगाचाही पासपोर्ट असतो. या विविध रंगाच्या पासपोर्टचा नेमका अर्थ काय? अशा विविध रंगाचे पासपोर्ट कुणाला मिळतात?
1 / 5
परदेश वारीसाठी पासपोर्ट हा महत्वाचा घटक असतो. देशाबाहेर हा एक घटकच तुम्ही भारतीय नागरिक असल्याचा सर्वात मोठा पुरावा असतो. सर्वसामान्य नागरिकांना निळ्या रंगाचा पासपोर्ट मिळतो. पण तुम्हाला माहिती आहे का की निळ्या रंगाच्या पासपोर्टसह मरुन, पांढरा आणि नारंगी रंगाचाही पासपोर्ट असतो. या विविध रंगाच्या पासपोर्टचा नेमका अर्थ काय? अशा विविध रंगाचे पासपोर्ट कुणाला मिळतात?
2 / 5
निळ्या रंगाचा पासपोर्ट : भारतातील सर्वसामान्य नागरिकाला निळ्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो. हा पासपोर्ट विदेशात तुम्ही भारतीय असल्याचा पुरावा असतो. याचा रंग निळा ठेवण्यात आला आहे. जेणेकरुन सर्वसामान्य भारतीय नागरिकाची ओळख पटू शकेल. यात संबंधित व्यक्तीचा फोटो, जन्मतारीख, जन्म ठिकाण, पत्ता आणि स्वाक्षरीसह अन्य बाबीही असतात.
3 / 5
नारंगी रंगाचा पासपोर्ट : भारत सरकारकडून नारंगी रंगाचा पासपोर्टही जारी केला जातो. हा पासपोर्ट अशा व्यक्तींना दिला जातो ज्यांचं शिक्षण फक्त 10 वी पर्यंतच झालेलं आहे. हा पासपोर्ट जास्त करुन विदेशात मायग्रंट कामगारांसाठी असतो. त्यांना माहिती मिळवण्यासाठी कुणाच्या तरी मदतीची गरज असते. या पासपोर्टमध्येही पासपोर्ट धारकाची संपूर्ण माहिती दिलेली असते.
4 / 5
पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट : पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट कुणाकडे असेल तर तो सरकारी पदाधिकारी असल्याचं समजावं. या रंगाचा पासपोर्ट हा सरकारी पदाधिकाऱ्यालाच दिला जातो तो त्यांची ओळख दर्शवतो. हा पासपोर्ट त्यांच्याकडे असतो जे सरकारकी कामकाजासाठी परदेशात जात असतात. कस्टम चेकिंगवेळी पांढऱ्या रंगाच्या पासपोर्ट धारकासोबत त्यात प्रकारे सन्मानाने वागलं जातं.
5 / 5
मरुन रंगाचा पासपोर्ट : या रंगाचा पासपोर्ट हा भारतीय उच्चायुक्तालयाशी संबंधित अधिकाऱ्यांना जारी केला जातो, जे विदेशात भारताचं प्रतिनिधित्व करतात. सामान्य पासपोर्टपेक्षा वेगळा ठेवण्याचा उद्देश हाच आहे की अशा लोकांची विशेष ओळख दाखवतो. महत्वाची बाब ही की असा या रंगाचा पासपोर्ट असलेल्या व्यक्तीवर परदेशात सहजासहजी गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. त्यासाठी मोठ्या प्रक्रियेतून जावं लागतं. सर्व सामान्य नागरिकांच्या तुलनेत या रंगाचा पासपोर्ट असलेल्या व्यक्तीला कोणताही व्हिसा लागत नाही. यांना इमिग्रेशनमध्येही कमी वेळ लागतो आणि अन्य सुविधाही मिळतात.