फाफ डुप्लेसीने आज RCB कडून धमाकेदार डेब्यु केला. त्याने पंजाब किंग्सची गोलंदाजी अक्षरक्ष: फोडून काढली. त्याच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर चेन्नइ सुपर किंग्सला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.
मागच्या महिन्यात झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने फाफ डुप्लेसीला 7 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. त्याआधी डुप्लेसी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळायचा.
एमएस धोनीच्या बायोपिकमधील सीनचा फोटो एका युझरने टि्वट केला आहे. यातून नेमका अर्थ क्रिकेट चाहत्यांच्या लगेच लक्षात येईल.
फाफ डुप्लेसीची आज सावध-संयमी सुरुवात केली. पण त्याने आपल्या फलंदाजीचा गेअर बदलत जोरदार हल्लाबोल केला. पहिल्याच सामन्यात डुप्लेसीने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत अर्धशतकी खेळी केली.
काल सलामीच्या सामन्यात सीएसकेचा पराभव झाला. त्यांनी अवघ्या 131 धावा केल्या होत्या. आज डुप्लेसीची खेळी पाहून सीएसकेच्या मॅनेजमेंटची अशी अवस्था असेल.
फाफ डुप्लेसीने आज किंग्स इलेवन पंजाब विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीसोबत मिळून शतकी भागीदारी केली.
फाफ डुप्लेसीने आधी डावाच्या सुरुवातीला पंजाबच्या गोलंदाजांना आदर दिला. पण नंतर त्यांची जोरदार धुलाई केली. त्यासाठी फॅमिली मॅन वेब सीरीजमधला हा फोटो वापरला आहे.
डुप्लेसीने आज 57 चेंडूत 88 धावांची स्फोटक खेळी केली. यात तीन चौकार आणि सात षटकार होते. डुप्लेसीची आजची इनिंग बघून CSK च्या चाहत्यांची अशी अवस्था झाली असेल, असे मीम्स व्हायरल झाले आहेत.
फाफ डुप्लेसीची सुरुवात बघून त्याच्याकडून कोणी अशी अपेक्षा केली नसेल. पण नंतर गोलंदाजांचा कर्दनकाळ बनला.
फाफ डुप्लेसीची आज सावध-संयमी सुरुवात केली. पण त्याने आपल्या फलंदाजीचा गेअर बदलत जोरदार हल्लाबोल केला. पहिल्याच सामन्यात डुप्लेसीने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत अर्धशतकी खेळी केली.