Marathi News Photo gallery Ganesh Chaturthi 2021 Arrival of Ganpati Bappa at the residence of Leader of Opposition Devendra Fadnavis in Mumbai
Photo : कोरोनाचं संकट दूर कर, शेतकऱ्यांना बळ दे; देवेंद्र फडणवीसांचं गणरायाला साकडं
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर या शासकीय निवासस्थानी आज गणपती बाप्पाचं आगमन झालं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी फडणवीस यांच्या पत्ती अमृता फडणवीस, मुलगी दिवीजा आणि कुटुंबिय उपस्थित होते.
1 / 5
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर या शासकीय निवासस्थानी आज गणपती बाप्पाचं आगमन झालं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी फडणवीस यांच्या पत्ती अमृता फडणवीस, मुलगी दिवीजा आणि कुटुंबिय उपस्थित होते.
2 / 5
श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. या विघ्नहर्त्याच्या स्थापनेच्या निमित्तानं आपण त्यांना साकडं घालूया की, जगासमोर, देशासमोर, महाराष्ट्रासमोर जे कोरोनाचं संकट आहे, ते संकट आता दूर झालं पाहिजे. आपलं जीवन पूर्वीसारखं सुचारू झालं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
3 / 5
त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रावर जी सारखी संकटं येतात, कधी पुराचं, कधी वादळाचं तर कधी अतिवृष्टीचं आहे, यातूनही आमच्या शेतकऱ्यांना मुक्ती मिळावी. शेतकऱ्याला बळ मिळावं आणि गणरायाने त्यांना आशीर्वाद द्यावा, अशी गणराया चरणी प्रार्थना आहे. त्याचसोबत गणरायाने आपल्या सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि चांगलं काम करण्याची प्रेरणा द्यावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
4 / 5
मंदिरांच्या मुद्द्यावरुनही फडणवीसांनी भाष्य केलं. मंदिरं सुरु करण्याचं आमची मागणी केवळ यासाठी आहे की, आम्ही हिंदू आहोत, आमचे 33 कोटी देव आहेत. सगळीकडे, जिथे आम्ही मानू तिथे देव आहे. पण त्यासोबत या मंदिरांवर अवलंबून असलेले लाखो लोक आहेत, असं फडणवीस म्हणाले.
5 / 5
मंदिराबाहेर कुणी फुलं, कुणी प्रसाद, कुणी उदबत्ती, कुणी हळद-कुंकु विकतंय. मंदिरांवर अवलंबून असलेले पुजारी, तिथले सेवक आहेत. या दोन वर्षाच्या काळात या सगळ्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. म्हणून आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की मदिरालय सुरु होऊ शकतं तर मंदिर का नाही? सरकारनं नक्की नियमावली लावावी. आज फक्त महाराष्ट्रातील मंदिरं बंद आहेत. त्यामुळे गणरायाने सरकारलाही सुबुद्धी द्यावी अशी, मागणी यावेळी फडणवीसांनी केलीय.