Marathi News Photo gallery NCP President Sharad Pawar visits MLA Nilesh Lanke's house at Parner Ahemadnagar, Welcome to Sharad Pawar from Lanke family
Photo : शरद पवार आमदार निलेश लंकेंच्या घरी, आई-वडिलांची विचारपूस; लंके कुटुंब भारावलं
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज आमदार निलेश लंके यांच्या घरी भेट दिली. निलेश लंके हे नगरच्या पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. कोरोना संकटाच्या काळात निलेश लंके यांनी सुरु केलेल्या कोविड सेंटरची चर्चा राज्यातच नाही तर संपूर्ण देशात आणि जगभरात झाली आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक शरद पवारांसह पक्षाच्या सर्वच नेत्यांनी केलं आहे.
1 / 7
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज आमदार निलेश लंके यांच्या घरी भेट दिली. निलेश लंके हे नगरच्या पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.
2 / 7
कोरोना संकटाच्या काळात निलेश लंके यांनी सुरु केलेल्या कोविड सेंटरची चर्चा राज्यातच नाही तर संपूर्ण देशात आणि जगभरात झाली आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक शरद पवारांसह पक्षाच्या सर्वच नेत्यांनी केलं आहे.
3 / 7
शरद पवार लंके यांच्या घरी दाखल झाल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पवारांना पाहण्यासाठी लोक आजूबाजूला असणाऱ्या घरांच्या छतावर बसले होते. पवारांच्या गाडीवर पुष्पवृष्टीकरुन त्यांचं स्वागत करण्यात आलं.
4 / 7
महत्वाची बाब म्हणजे आमदार, खासदाराचं घर म्हणजे मोठा बंगला, अलिशान गाड्या, नोकरचाकर असं चित्र असतं. पण आमदार निलेश लंके यांचं घर अत्यंत साधं आहे. एक रुम, त्यातच छोटं किचन आणि बाजूला बाथरुम अशी लंके यांच्या घराची रचना आहे. याच घराच्या लाकडी चौकटीतून पवारांनी लंकेंच्या घरात प्रवेश केला.
5 / 7
आपल्या पत्र्याच्या छोट्या घरात पक्षाचे अध्यक्ष आणि देशातील एका बड्या नेत्यानं भेट दिल्यानं लंके कुटुंबीय भारावून गेलं होतं. एका प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून पवार यांनी निलेश लंके यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.
6 / 7
लाकडी कपाटाला टेकून ठेवण्यात आलेल्या खुर्चीवर बसून पवारांनी निलेश लंके यांच्या आई-वडिलांची चौकशी केली. तसंच निलेश लंके यांच्या कार्याबाबत कौतुकही केलं.
7 / 7
यावेळी मंत्री सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार रोहित पवारही उपस्थित होते.