Marathi News Photo gallery ZP and Panchayat Samiti by Election Congress won highest number of seats in the Panchayat Samiti by election, BJP is second, ShivSena is third and NCP is fourth position
Photo : पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष! शिवसेनेपेक्षा भाजप सरस, तर राष्ट्रवादीला झटका
पंचायत समितीच्या 144 जागांपैकी 144 जागांचा कल हाती आलाय. त्यात इतर पक्ष किंवा अपक्षांना सर्वाधिक जागा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्या प्रमुख पक्षांपैकी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना चौथ्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या क्रमांकावर फेकली गेल्याचं पाहायला मिळत आहे.
1 / 6
अकोला पंचायत समिती पोटनिवडणुकीत सर्वच मोठ्या राजकीय पक्षांना मागे टाकत वंचित बहुजन आघाडीनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर बच्चू कडू यांच्या प्रहारनेही विजयी साजरा करण्याची संधी मिळवली आहे. अकोला जिल्ह्यातील 28 पंचायत समिती गणांपैकी वंचित, प्रहार आणि अपक्षांच्या 19 जागा निवडून आल्या आहेत. तर भाजपला 4, शिवसेनेला 5 जागा जिंकण्यात यश मिळालं आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस भोपळाही फोडू शकले नाहीत.
2 / 6
धुळे जिल्ह्यातील पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजपचा वरचष्मा पाहयला मिळाला. धुळे जिल्हा परिषदेची सत्ताही भाजपनं राखली आहे. धुळ्यातील पंचायत समितीच्या 30 गणांपैकी भाजपनं 15 जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसला 5 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 3 जागा जिंकण्यात यश आलंय. तर इतरांनी 4 जागा जिंकल्या आहेत.
3 / 6
नागपूरमध्ये काँग्रेसनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला मोठा झटका दिलाय. नागपुरातील 31 पंचायत समिती गणांपैकी काँग्रेसनं तब्बल 21 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला अवघ्या 06 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. शिवसेनेला खातंही उघडता आलं नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 जागा जिंकल्या आहेत. तर इतरांना 2 जागा मिळाल्या आहेत.
4 / 6
नंदूरबार मध्ये भाजपला झटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्याही जागा भाजपनं गमावल्या आहेत. नंदूरबारमध्ये 14 पंचायत समिणी गणांपैकी भाजपला केवळ 3 जागा जिंकता आल्या. तर शिवसेनेनं 6 जागा जिंकल्या आहेत. त्या पाठोपाठ काँग्रेसला 4 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेसह चौथ्या क्रमांकावर फेकला गेलाय. इथं एकाही अपक्षाला यश मिळालं नाही.
5 / 6
पालघर पंचायत समिती निवडणुकीत 14 गणांमध्ये शिवसेनेनं 5 जागा जिंकत क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. त्या पाठोपाठ भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा जिंकता आल्या. काँग्रेसला मात्र एकाही जागेवर यश मिळालेलं नाही. पालघरमध्ये इतर पक्ष आणि अपक्षांना 4 जागा जिंकल्या आहेत. पालघरमध्ये जिल्हा परिषदेतही शिवसेनेला यश मिळालं असलं तरी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा पराभव झाल्यानं शिवसेनेला मोठा झटका बसल्याचं पाहयला मिळतंय.
6 / 6
वाशिम पंचायत समिती पोटनिवणुकीत प्रमुख राजकीय पक्षांपेक्षा इतर आणि अपक्ष उमेदवारांनी 9 जागांवर यश मिळालं आहे. वाशिम पंचात समितीच्या 27 गणांसाठी निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 5 आणि शिवसेनेला 3 जागा जिंकता आल्या. तर 2 जागांसह भाजप चौथ्या क्रमांकावर फेकला गेलाय.