आमिर खान आणि त्याच्या एक्स पत्नीचे फोटो व्हायरल, रतन टाटा यांना…
बॉलिवूड अभिनेता आमिर खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. आमिर खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आमिर खान याने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. आमिर खान हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे.
1 / 5
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी काल जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर एक मोठी पोकळी नक्कीच निर्माण झालीये. आज रतन टाटा यांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने पोहोचले होते.
2 / 5
अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रतन टाटा यांना श्रद्धाजंली वाहिली. रतन टाटा यांचे कार्य अत्यंत मोठे आहे. अनेक लोक रतन टाटा यांना श्रद्धाजंली वाहताना आपले अश्रू लपवू शकले नाहीत
3 / 5
रतन टाटा यांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा आपल्या एक्स पत्नीसोबत पोहोचला. आता त्याचेच काही फोटो व्हायरल होत आहेत.
4 / 5
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात रक्तदाब कमी झाल्याने रतन टाटा यांना दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.
5 / 5
रतन टाटा यांच्या निधनाची बातमी कळताच लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले. जवळपास सर्वच कलाकारांनी रतन टाटा यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या.