दिल्ली ट्रीपचे नियोजन करत आहात? मग या पर्यटस्थळांना आवश्य भेट द्या

| Updated on: Jan 23, 2022 | 5:31 PM

दिल्लीमध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. तुम्ही दिल्लीमध्ये गेल्यावर त्यांना भेट देतात. मात्र दिल्लीमध्ये असेही काही पर्यटनस्थळे आहेत, जे फारसे परिचित नाहीत. मात्र दिल्ली टूरमध्ये तुम्ही या स्थळांना भेट दिल्यास तुमचा आनंद द्विगुणीत होऊ शकतो. तेथील निसर्ग सौंदर्य आणि वास्तू शिल्पाचा तुम्ही आनंद घेऊ शकता. आज आपन अशाच काही पर्यटनस्थळांबद्दल जाणून घेणार आहोत.

1 / 5
हौज खास किल्ला :  हा किल्ला  दिल्लीच्या प्राचीन वास्तूंपैकी एक आहे. किल्ल्याच्या परिसरात सर्वत्र लहान घुमट आहेत, ही सर्व घुमट हिरवळीने नटलेली आहेत. याच किल्ल्याच्या परिसरामध्ये एक हरिण पार्क देखील आहे. तसेच इथे एक प्राचीन तलाव देखील आहे. हा तलाव या किल्ल्याचे सौंदर्य आणखी वाढवतो.

2 / 5
दमदमा तलाव - वीकेंडला एक दिवस कुठेतरी फिरण्याचा प्लॅन बनवायचा असेल, तर तुम्ही दमदमा तलावावर जाऊ शकता. दिल्ली एनसीआरमध्ये असलेले दमदमा तलाव हे एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. ज्यांना छायाचित्र काढण्याची आवड आहे, अशा व्यक्तीने किमान एकदा तरी या तलावाला भेट द्यावीच असे या तलावाचे सौंदर्य आहे. इथे तुम्ही बोट राईड आणि उंट राईडचा देखील आनंद घेऊ शकता.

3 / 5
 चांदणी चौक - तुम्ही पहिल्यांदाच चांदणी चौकात जात असाल तर परांठे वाली गलीला आवश्य भेट द्या. येथील पेठाची भाजी आणि दह्यासोबत सर्व्ह केलेले पराठे तुमचा दिवस खास बनवतील. ज्यांना विविध पदार्थ खाण्याची आवड आहे अशा व्यक्तींनी एकदा  तरी या ठिकाणाला भेट द्यावी.

4 / 5
 लोटस टेंपल - शांततेत काही वेळ घालवण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. या मंदिराचा आकार कमळासारखा दिसतो. म्हणूनच त्याला लोटस टेंपल म्हणतात. लोटस टेंपल हे बहाई पूजेचे मंदिर मानले जाते. लोटस टेंपलमध्ये कोणत्याही मूर्ती किंवा धार्मिक प्रतिमा नाहीत. मन:शांती मिळवण्यासाठी पर्यटक येथे येतात.

5 / 5
हुमायूचा मकबरा - हा मकबरा देखील पर्यटकांचे विशेष आकर्षण असते. हुमायूची कबर मुघल स्थापत्यकलेचा एक सुंदर नमुना आहे. या मकबऱ्याचे सौंदर्य पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. या वास्तूच्या चारही बाजुने सुंदर अशा बागा तयार करण्यात आल्या आहेत.