Marathi News Photo gallery PM Narendra Modi's roadshow draws large crowds as he campaigns for the last phase of Uttar Pradesh Assembly elections
Photo Gallery: यूपीत ‘मोदी वादळ’, पंतप्रधानांच्या रोड शोला 3 किलोमीटरपर्यंत तुफान गर्दी; गर्दी इतकी की नजरच हटेना!
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या (Up Elections 2022) सात टप्प्यात निवडणुका होत आहेत. आतापर्यंत सहा टप्प्यांसाठी मतदान पार पडले आहे. आता शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. येत्या 7 मार्च रोजी हे मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी विधानसभेचा निकाल लागणार असून त्याच दिवशी सर्व चित्रं स्पष्ट होणार आहे.
1 / 7
वाराणासी: उत्तर प्रदेशात विधानसभेच्या (Up Elections 2022) सात टप्प्यात निवडणुका होत आहेत. आतापर्यंत सहा टप्प्यांसाठी मतदान पार पडले आहे. आता शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. येत्या 7 मार्च रोजी हे मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी विधानसभेचा निकाल लागणार असून त्याच दिवशी सर्व चित्रं स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nrendra Modi) यांचा वाराणासीत रोड शो सुरू आहे. वाराणासीत (varanasi) मोदींचा प्रचंड मोठा आणि भव्य असा रोड शो सुरू आहे. या रोड शोमध्ये नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे. सगळीकडे माणसच माणसं दिसत आहेत. नजर हटत नाहीत एवढी गर्दी झाली आहे. तब्बल तीन किलोमीटरपर्यंत माणसांचा जत्थाच जत्था दिसत आहेत. यावेळी मोदींवर फुलांचा वर्षाव करण्यात येत असून मोदीही कधी हात उंचावून तर कधी हात जोडून मतदारांना अभिवादन करताना दिसत आहेत.
2 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणासीच्या मालदहिया चौकापासून रोड शो सुरू केला आहे. या रोड शोमध्ये हजारोंच्या संख्येने लोक जमले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा इतिहास बदलून टाकला आहे. त्यांच्या सारखा कोणीच पंतप्रधान झाला नाही, अशी भावना काशीचे लोक व्यक्त करत आहेत.
3 / 7
पंतप्रधान मोंदींनी रोड शो सुरू करण्यापूर्वी वाराणासीच्या मालदहिया चौकातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केले. मोदींचा हा रोडशो बाबा विश्वनाथ कॉरिडोरपर्यंत जाणार आहे. तिथे गेल्यावर मोदी काशी विश्वनाथाचं दर्शन करतील.
4 / 7
मोदी वाराणासीच्या कँट, वाराणासी शहर उत्तर आणि वाराणासी शहर दक्षिण या तीन मतदारसंघात रोड शो करणार आहेत. मोदी येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फुलांची बरसात करत त्यांचं भव्य स्वागत केलं.
5 / 7
मोदींच्या रोड शोला मोठी गर्दी उसळली आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. मोदींवर फुलांची बरसात करतानाच जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या जात आहेत.
6 / 7
भगवी टोपी घालून मोदी काशीतील नागरिकांचं अभिवादन स्वीकारताना दिसत आहे. तसेच जनतेकडून मिळणाऱ्या भेटीचा स्वीकार करत आहेत.
7 / 7
येत्या 7 मार्च रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार असल्याने मोदी दोन दिवस म्हणजे 5 मार्चपर्यंत वाराणासीत राहणार आहेत. या दोन दिवसात काशीत ते एक कॅम्प करणार आहेत. उद्या शनिवारी खजुरीमध्ये जनसभेला संबोधित करणार आहेत.