सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना विमानाने आणले मुंबईत, ‘ते’ फोटो व्हायरल
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घरावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. हेच नाही तर ज्यावेळी सलमान खान याच्या घरावर हा गोळीबार करण्यात आला. त्यावेळी सलमान खान हा घरातच होता.
1 / 5
रविवारची सकाळ सलमान खान याच्या चाहत्यांसाठी अत्यंत हैराण करणारी नक्कीच ठरली. सलमान खान याच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांच्या निशाण्यावर सलमान खान याची बाल्कनी होती.
2 / 5
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर आले. तब्बल वीस तपास पथके तयार करण्यात आली. गुजरातमधील भुजमधून हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले.
3 / 5
क्राइम ब्रांच आणि मुंबई पोलिसांनी या हल्लेखोरांना ताब्यात घेतले. रात्री विमानाने या हल्लेखोरांना मुंबईमध्ये आणले गेले आहे. आता याचेच काही फोटो व्हायरल होत आहेत.
4 / 5
या फोटोंमध्ये हल्लेखोरांचा चेहरा दिसत नाहीये. आता हे हल्लेखोर मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणात काही मोठे खुलासे हे केले जाऊ शकतात.
5 / 5
हे दोन्ही आरोपी गेल्या काही दिवसांपासून पनवेलमध्ये राहत होते. हेच नाही तर या गोळीबाराचे प्लॅनिंग गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचे देखील पुढे आले.