महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबवणार अशा आशयाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट केला होता.
याच पार्श्वभूमीवर आज दादर येथे सकाळी 10 वाजता ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी अमित ठाकरे या स्वच्छता अभियानात सहभागी झाले.
यावेळी समुद्र किनारे हा एक ठेवा आहे तो सुरक्षित राहिला पाहिजे, ज्यांची 25 वर्षे सत्ता होती त्यांनी काहीच केलं नाही असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
त्याच प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील 40 समुद्र किनारे स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अशी माहीती देखील त्यांनी यावेळी दिली.
मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून आज राज्यातील ७२० किलोमिटर लांबीच्या किनारपट्टीवर स्वच्छता मोहिम राबवली जाणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात मनसे या समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेच्या माध्यमातून आपले पाय घट्ट रोवण्यासाठी सज्ज झालीय.
या अभियानात तळकोकणापासून ते पालघर मुंबई पर्यत ४० समुद्रकिनारे स्वच्छ केले जाणार आहेत. सिंधुदूर्गातील ३ , रत्नागिरीतील ६ , रायगडमधील ६ पालघरमधील ३ आणि मुंबईत देखिल ६ ठिकाणी मनसे समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता करणार आहे.
रत्नागिरीतील मांडवी, गणपतीपुळे, दापोली, मुरुड, हर्णे आणि कर्दे समुद्र किनाऱ्यांवर सकाळी १० ते १ या वेळेत स्वच्छता केली जाणार आहे.
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता मोहिम राबवण्यापुर्वी मांडवी समुद्र किनाऱ्याची पाहणी केली.