पाच राज्यातल्या निवडणुकीतली ती पाच मोठी नावं ज्यांचा पराभव झाला !

| Updated on: Mar 10, 2022 | 4:24 PM

आज राज्यातील पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर हाती आले आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामध्ये सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. नेमक्या कोणत्या बड्या नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला ते जाणून घेऊयात.

1 / 5
हरिश रावत : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार हरिश रावत हे उत्तराखंडच्या लालकुआ मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. हरिश रावत यांचा हा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. या मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होती. अखेर या लढतीमध्ये हरिश रावत यांचा पराभव झाला आहे.

2 / 5
नवज्योतसिंग सिद्धू : अमृतसर ईस्टमधून काँग्रेसचे उमेदवार नवज्योतसिंग सिद्धू यांचा पराभव झाला आहे. आम आदमी पार्टीच्या उमेदवार जीवनज्योत कौर यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांचा पराभव केला. सिद्धू हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सिद्धू यांचा पराभव हा राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.

3 / 5
सुखबीर सिंग बादल : यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुखबीर सिंग बादल हे जलालाबाद मतदारसंघातून उभे होते, हा मतदारसंघ त्यांच्यासाठी अत्यंत सुरक्षित माणण्यात येत होता. मात्र तरी देखील आम आदमी पार्टीच्या उमेदवाराकडून सुखबीर सिंग बादल यांचा पराभाव झाला आहे.

4 / 5
उत्पल पर्रिकर :  उत्पल  पर्रिकर यांचा देखील पराभव झाला आहे. उत्पल  पर्रिकर मनोहर पर्रिकरांचे सुपुत्र आहेत. पणजी मतदारसंघातून त्यांना भाजपचे बाबुश मोन्सरात यांनी पराभूत केले.

5 / 5
चंद्रकांत कवळेकर : बाबू उर्फ चंद्रकांत कवळेकर हे काँग्रेस सोडून भाजपात गेले होते. त्यांना प्रमोद सावंत सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यांच्या पराभवानं भाजपला मोठा धक्का बसलाय. 2019 साली पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. तेव्हा भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसमधील काही आमदार रातोरात भाजपात गेले होते. या सगळ्या राजकीय हालचालींमध्ये कवळेकर यांची भूमिकाही महत्त्वाची होती.