मनोहर जोशी यांचं पहाटे 3 वाजून 02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. शिवसेनेचे चाणाक्य म्हणून देखील त्यांची ओळख होती. शिवसेनेत कार्यरत असताना कोणता निर्णय कधी आणि कशाप्रकारे घ्यायचा यामध्ये मनोहर जोशी यांचा मोठा वाटा असायचा.
मनोहर जशी, लालकृष्ण आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदुत्वासाठी मोठा लढा दिला. अनेक संकटांचा सामना देखील तिघांनी एकत्र केलं. अटल बिहारी वाजपेयी यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मनोहर जशी यांनी शिवसेनेचा सुवर्णकाळ पाहिलेला होता. एवढंच नाहीतर, बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर जशी यांनी राजकारणातील धडे गिरवले.
मनोहर जोशी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत मुंबईचे महापौरपद, राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि लोकसभेचे अध्यक्ष अशी प्रतिष्ठित पदे भुषविली होती. पण आज त्यांचं निधन झाल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोहर जोशी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.