वणीच्या सप्तश्रृंगी गडावर जाऊन माथा टेकून परतताना वाटेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. दिंडोरी रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला होता. त्यामुळे रस्त्यावर दुतर्फा कोंडी झाली होती. भुजबळांनी स्वतः उभे राहून ही वाहतूक सुरळीत केली.
वणी येथील दर्शन कार्यक्रम आटोपून भुजबळ परतीच्या प्रवासाला निघाले. तेव्हा दिंडोरी रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला होता. घटनास्थळी दोन्ही बाजूंनी कित्येक लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे लक्षात येताच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपला ताफा थांबवला. ते स्वतः गाडीतून खाली उतरले. त्यांनी अपघातस्थळी जात विचारपूस केली. तिथे असलेल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
मालवाहतूक करणाऱ्या वाहनाच्या अपघातामुळे संपूर्ण वणी दिंडोरी रस्ता जाम झाला होता.
वाहतूक सुरळीत करण्याचा सूचना केल्या. स्वतःही वाहतूक सुरळीत केली. मंत्री महोदयांनीच दखल घेतल्यामुळे थोड्याच वेळात वाहतूक पूर्ववत सुरू झाली. दिंडोरी रस्त्यावर अनेकदा किरकोळ अपघात होतात. त्यामुळे दुतर्फा वाहतूक कोंडी होते. कित्येकवेळ वाहतूक सुरळीत करण्यात जातो. हा मार्ग रूंदीने मोठा केल्यास हा प्रश्न सुटू शकतो.
छगन भुजबळ यांनी रस्त्यावर उतरुन अपघातग्रस्तांची विचारपूस करून तात्काळ मदत करत संवेदनशीलता दाखवून दिली आहे.